rajkiyalive

होमपीच शिरोळमध्ये राजू शेट्टींना मोठ्या लीडची गरज

गेल्या तीनही निवडणुकीत लीड कमीच

दिनेशकुमार ऐतवडे

होमपीच शिरोळमध्ये राजू शेट्टींना मोठ्या लीडची गरज : 2002 मध्ये जिल्हा परिषद सदस्य, 2004 मध्ये शिरोळ विधानसभेत आमदार, 2009 आणि 2014 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना आपल्या होमपीच शिरोळ विधानसभा मतदार संघात कायम लीड कमीच मिळाले आहे. यंदाचे मैदाना मारायचे असेल तर राज्ाू शेट्टींना होम ग्राउंड शिरोळमधून मोठे मताधिक्य घेण्याची गरज आहे.

होमपीच शिरोळमध्ये राजू शेट्टींना मोठ्या लीडची गरज

शरद जोशींच्या नंतर शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शिरोळच्या राजू शेट्टींनी मोठे मैदान गाजवले. गेल्या 22 वर्षापासून शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या नेत्याला शेतकर्‍यांनीही डोक्यावर घेतले. गेल्या वेळच्या पराभवाचा अपवाद वगळता राजू शेट्टींची कमान कायमच चढती राहिली आहे.

राजू शेट्टी संघटनेत काम करीत असताना 2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली.

शरद जोशींच्या पावलावर पाउल ठेवत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांनी समाजमनावर आपला कायमचा ठसा कोरला आहे. त्यापैकीच एक म्हणजे राजू शेट्टी. राजू शेट्टी संघटनेत काम करीत असताना 2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना यश आले. जिल्हा परिषद सदस्य असतानाच विधानसभा निवडणूक लागल्या. कार्यकर्त्यांच्या जिवावर राजू शेट्टींनी विधानसभा लढवली. एक व्होट आणि एक नोट या तत्वावर शेतकर्‍यांनी त्यांना नोटही आणि व्होटही दिले. विधानसभा टर्म संपताच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. शेट्टींचाही आवाका वाढला होता.

2009 मध्ये लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना झाली.

इचलकरंजी हा मतदार संघ फोडून नव्याने हातकणंगले लोकसभा मतदार संघांची निर्मिती झाली. या मतदार संघात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आणि पन्हाळा शाहूवाडी या विधानसभा मतदार संघांचा समावेेश करण्यात आला.
यातील शिरोळ विधानसभा हे राजू शेट्टींचा होम ग्राउंड. त्यामुळे येथून राजू शेट्टींना कायमच पाठबळ मिळाले. परंतु म्हणावे तसे लीड त्यांना मिळाले नाही. याचा फटका त्यांना 2019 च्या निवडणुकीत बसला.

शिरोळ मतदार संघांतून त्यांना केवळ 4 हजार 891 मताचे मताधिक्य मिळाले.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने खासदार असलेल्या निवेदिता मानेंना उतरवले. यावेळी राजू शेटटींना 83 हजार 258 मते मिळाली तर निवेदिता मानेंना 78 हजार 367 मते मिळाली. यावेळी राजू शेट्टींचा जरी विजय झाला असला तरी शिरोळ मतदार संघांतून त्यांना केवळ 4 हजार 891 मताचे मताधिक्य मिळाले. इतर मतदार संघातून त्यांना मोठे मताधिक्य मिळत असताना शिरोळमधील मताधिक्य विचार करायला लावणारे होते.

राजू शेट्टींना 23 हजार 553 एवढे चांगले मताधिक्य मिळाले.

2014 च्या निवडणुकीत राजू शेर्ट्टींंनी भाजप आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने कल्लापाण्णा आवाडे यांना उभे केले. यावेळी राजू शेट्टींना 1 लाख 11 हजार 126 मते मिळाली तर आवाडेंना 87 हजार 573 मते मिळाली. यावेळी राजू शेट्टींना 23 हजार 553 एवढे चांगले मताधिक्य मिळाले. त्यांचा विजय झाला.

राजू शेट्टींना विजयी व्हायचे असेल तर होम ग्राउंड असणार्‍या शिेरोळमधून मोठे मताधिक्य घ्यावे लागेल.

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात भाजप शिवसेनेने नवख्या धैर्यशील मानेंना उतरवले. यावेळी शिरोळ विधानसभा मतदार संघात राजू शेट्टींना 99 हजार 977 मते मिळाली. तर धैर्यशील मानेंना 92 हजार 929 मते मिळाली. राजू शेटटींना केवळ 7 जाराचे लीड मिळाले. यंदाच्या निवडणुकीत राजू शेट्टींना विजयी व्हायचे असेल तर होम ग्राउंड असणार्‍या शिेरोळमधून मोठे मताधिक्य घ्यावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज