rajkiyalive

ICHALKARANJI VIDHANSABHA : पुत्रप्रेमापोटी आवाडे भाजपमध्ये, ताराराणी आघाडी वार्‍यावर

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

ICHALKARANJI VIDHANSABHA : पुत्रप्रेमापोटी आवाडे भाजपमध्ये, ताराराणी आघाडी वार्‍यावर : कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री असलेल्या आ.प्रकाश आवाडे यांनी नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पूत्र राहूल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. ताराराणी आघाडीचे सर्व्हेसर्वा असलेल्या आवाडेंनी आपल्या पुत्राची तर उमेदवारीची घोषणा केलीच परंतु गेल्याच महिन्यात हातकणंगलेमधून ताराराणी आघाडीतून घोषणा केलेल्या जयश्री कुरणेचे आता काय करणार असा प्रश्न पडला आहे. ताराराणी आघाडीचे भवितव्य काय हाही प्रश्न विचारला जात आहे.

ICHALKARANJI VIDHANSABHA : पुत्रप्रेमापोटी आवाडे भाजपमध्ये, ताराराणी आघाडी वार्‍यावर

पश्चिम महाराष्ट्रातील एक बडे प्रस्थ म्हणून इचलकरंजीच्या आवाडे घराण्याकडे पाहिले जाते. कल्लापाण्णा आवाडे यांनी विधानसभा, लोकसभा गाजवून राज्यात आदर्शवत असे सहकारात काम केले आहे. सहकाराच्या जोरावर त्यांनी अनेक वर्षे सत्ता आपल्या ताब्यात ठेवले. काही काळ कल्लापाण्णा आवाडे आणि त्यांचे पूत्र प्रकाश आवाडे यांच्या हातात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही होते.

कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठोपाठ त्यांचे पूत्र प्रकाश आवाडे यांनीही काही काळ विधानसभा गाजवली.

काँग्रेसच्या काळात ते मंत्रीही होते. सध्या ते अपक्ष आमदार आहेत. काँग्रेस पक्षात असताना पक्षाला भिती घालण्यासाठी त्यांनी ताराराणी आघाडीची स्थापना केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांनी या आघाडीच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधीही पाठवले. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उभे राहून भाजपच्या हाळवणकरांचा पराभव केला. निवडणुकीनंतर त्यांनी लगेच भाजपला पाठिंबा दिला. गेल्या पाच वर्षे ते भाजपबरोबर आहेत. आवाडे घराण्याची तिसरी पिढी आता राजकारणात आपले बस्तान बसविण्याच्या तयारीत आहे. राहूल आवाडे यांना आमदारकीचे वेध लागले आहेत.

आजोबा, वडील आणि आता नातवाला आमदारकी हवी आहे.

त्यामुळे त्यांनी भाजपला भिती घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात त्यांनी हातकणंगले विधानसभा मतदार संघातून ताराराणी आघाडीकडून जयश्री कुरणेेंची उमेदवारी घोषित केली आहे. परंतु चार दिवसापूर्वी त्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसमध्ये असताना त्यांनी समांतर यंत्रणा चालवली होती. परंतु आता भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला ते चालणार नाही.

भाजपमध्ये राहून त्यांना ताराराणी आघाडी चालवता येणार नाही. एकतर ताराराणी आघाडी किंवा भाजप यापैकी एक पर्याय त्यांना निवडावा लागणार आहे. पूत्रप्रेमापोटी कोणत्याही परिस्थितीत त्यांना राहूल आवाडे यांना आमदार करायचे आहे. त्याही पेक्षा राहूल आवाडे यांना आता वडील किंवा आजोबा यांचे कोणाचेही ऐकायचे नाही. त्यामुळे ताराराणी आघाडीपेक्षा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला त्यांनी जवळ केले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे ताराराणी आघाडीचे काय, जयश्री कुरणेंचे काय असा मोठा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर पडला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज