rajkiyalive

इचलकरंजीतील 75 हजाराचे मताधिक्य धैर्यशील माने राखणार काय?

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

इचलकरंजीतील 75 हजाराचे मताधिक्य धैर्यशील माने राखणार काय? : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी इंचलकरंजीत ठाण मांडले आहे. गेल्या दोन महिन्यातील मुख्यमंत्र्यांचा हा आठवा दौरा आहे. हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदार संघ मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. हातकणंगलेमधील हॉटस्पॉट मतदार संघ असलेल्या इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील माने गतवेळचे 75 हजाराचे मताधिक्य राखणार काय? हीच चर्चा सर्वत्र आहे. त्यांच्या विजयासाठी हे मताधिक्य कोणत्याही परिस्थिती त्यांना अबाधित ठेवावे लागणार आहे.

इचलकरंजीतील 75 हजाराचे मताधिक्य धैर्यशील माने राखणार काय?

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून इचलकरंजी विधानसभा एकदमच प्रकाशझोतात आले आहे. कारण धैर्यशील माने यांच्या विजयात खारीचा नव्हे सिंहाचा वाटा या मतदार संघाचा होता. कारण येथून धैर्यशील मानेंना सुमारे 74 हजार 230 मताचे लीड मिळाले होते. माने यांना 1 लाख 24 हजार 837 मते मिळाली तर विरोधी काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना केवळ 49 हजार 907 मते मिळाली. गेल्या तीन निवडणुकीत एखाद्या विधानसभा मतदार संघात कोणालाच एवढे विक्रमी मते मिळाली नव्हती. इचलकरंजीचा पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा त्यावेळी निवडणुकीत महत्वाचा ठरला होता.

यंदाच्या निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले तरीही इचलकरंजीचा पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडविल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी सिंहगर्जना राज्ाू शेट्टी यांनी केली आहे. तसेच इचलकरंजीचा पाणीप्रश्न मीच सोडविणार आणि राज्ाू शेट्टींना फेटा मीच बांधणार असे धैर्यशील माने यांनी उत्तर दिले आहे. तिसरे उमेदवार महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांनीही पाणीप्रश्न मीच सोडविणार असे म्हटले आहे.

धैर्यशील मानें यांना 2019 च्या निवडणुकीत तीन मतदार संघांनी तारले तर तीन मतदार संघांनी मारले.

शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा मतदार संघात ते मागे राहिले तर इचलकरंजी, हातकणंगले आणि शाहूवाडी मतदार संघात ते आघाडीवर राहिले. शाहूवाडी मतदार संघात त्यांना 94 हजार 200 मते मिळाली तर राजू शेटटींना 72 हजार 457 मते मिळाली येथे 21 हजार 743 एवढे मताधिक्य धैर्यशील मानेंना मिळाले.

हातकणंगले विधानसभा मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 18 हजार 688 मते मिळाली तर राजू शेट्टींना 73 हजार 221 मते मिळाली येथे धैर्यशील मानेंना 45 हजार467 मताचे लीड मिळाले. इचलकरंजी मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 24 हजार 837 मते मिळाली तर राजू शेट्टी यांना 49 हजार 907 मते मिळाली. या ठिकाणी 74 हजार 930 मते मिळाली. या तीन मतदार संघातून मानेंना एकूण 1 लाख 42 हजार 140 मताचे लीड मिळाली.

इस्लामपूर मतदार संघात धैर्यशील मानेंना 74 हजार 700 मते मिळाली तर राजू शेट्टींना 93 हजार 250 मते मिळाली येथे राजू शेट्टींना 18 हजार 550 मताचे लीड मिळाले. शिराळा मतदार संघात धैर्यशील मानेंना 77 हजार 422 मते मिळाली तर राजू शेट्टींना 98 हजार 464 मते मिळाली. येथून राजू शेट्टींना 21 हजार 42 मते जास्त मिळाली. शिरोळ मतदार संघातून धैर्यशील मानेंना धैर्यशील मानेंना 92 हजार 929 मते मिळाली तर राजू शेट्टींना 99 हजार 977 मते मिळाली. येथून राजू शेट्टींना 7 हजार 45 इतके लीड मिळाली. या तीन मतदार संघातून राजू शेट्टींना 46 हजार 637 मतांचे लीड मिळाली.

यंदा पहिल्यांदाच चौरंगी लढत लागली आहे. त्यामुळे मतविभाजनी नक्कीच होणार आहे.

याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला हे निकालानंतरच समजेल. परंतु धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा निवडून यायचे असेल तर इचलकरंजीचे लीड कायम ठेवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या सोबतीला आ. प्रकाश आवाडे असणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे तळ ठोकूणच आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज