rajkiyalive

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान

इस्लामपूर ः प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, महाविकासआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, वंचित आघाडीचे डी.सी.पाटील अशी चौरंगी लढत आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान झाले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता इस्लामपूर मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. उन्हाचा कडाका असूनही गत लोकसभेला झालेल्या मतदानाएवढेच मतदान यंदाही झाले आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 70 टक्के मतदान

इस्लामपूूर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासूून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी व दुपारनंतर मतदनाचा टक्का वाढला. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते धडपड करित होते. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील दिवस भरातील आकडेवारी सकाळी 9 वाजता-7.76 टक्के, 11 वाजता-21.70, 1 वाजता-37.20 टक्के, 3 वाजता- 49.60, 5 वाजता-61.90, 6 वाजता-70 टक्के अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतांदरसंघातील साखराळे ता.वाळवा गावातील बौद्ध विहार येथील मतदान केंद्रावर सकाळी 11.30 वाजता मतदान केले.

त्यांच्यासमवेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, उद्योजक राजवर्धन पाटील होते. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी मरळनाथपूर ता.वाळवा येथे मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी कुटुंबियांसह उरुण परिसरातील शाळा नं.1 येथे रांगेत उभा राहून मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी येलूर ता.वाळवा तर भाजपाचे शिराळा विधानसभाप्रमुख सम्राट महाडीक यांनी पेठ ता.वाळवा येथे कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर येथील आदर्श हायस्कूलमध्ये मतदान केले. पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

साखराळेत युती-आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

इस्लामपूर : अपक्ष उमेदवाराच्या नावाने अनाधिकृत उमेदवार प्रतिनिधी नियुक्त करण्यात आल्याच्या कारणावरून साखराळे (ता. वाळवा) येथे मतदानावेळी महायुतीचे खा. धैर्यशीन माने समर्थक आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांच्यात जोरदार हाणामारी झाली. पोलीसांनी हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला असला तरी तणाव निर्माण झाला होता.

हातकणंगले मतदार संघातील साखराळे गावी सहा मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवार रामचंद्र साळुंखे यांच्या बोगस स्वाक्षरीने दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. या नियुक्तीला शिवसेनेच्या खा. धैर्यशील माने समर्थक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत हे प्रतिनिधी मतदारांना केंद्रावर चिन्हाचे नाव सांगून मतदानासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप केला. अपक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी असल्याचे दर्शवून ते ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला.

यामुळे शिवसेनेचे माने आणि ठाकरे गटाचे सरूडकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांची गचोटी धरत हाणामारीही झाली. पोलीसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला करत जमाव पांगवला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून मतदान केंद्रावरही अतिरिक्त पोलीस नियुक्त करण्यात आले.

या प्रकरणी केंद्राधिकार्‍यांकडे माने समर्थकांनी तक्रारही केली. वरिष्ठ अधिकारी आल्याविना मतदान होउ देणार नाही अशी भूमिका घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत लेखी तक्रार करण्याची सूचना देउन मतदान सुरू ठेवले.बोगस स्वाक्षरीने उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी माने समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज