dineshkumar aitawade 9850652056
jain mahamandal news : जैन महामंडळाची स्थापना केवळ नावापुरतेच : महाराष्ट्र सरकारने जैन अल्पसंख्यांक महामंडळाची स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या ललीत गांधी यांची निवड केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक असलेल्या जैन समाजाला मोठे लाभ मिळवून देण्याचे आश्वासन ललित गांधी यांनी दिली असली तरी अजूनतरी महामंडळाला निधी मिळाले असून, महामंडळाचे कार्यालयही दुसर्या कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे जैन महामंडळाची स्थापना केवळ नावापुरतेच झाले की काय असे प्रश्न विचारले जावू लागले आहेत.
jain mahamandal news : जैन महामंडळाची स्थापना केवळ नावापुरतेच
जैन महामंडळ स्थापन करावे अशी अनेक वर्षापासून अनेकांनी सरकारकडे केली होती. त्यामुळे सरकारचे याचा विचार करून जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवडही केली. त्याच्यासोबत इतर सदस्यांची निवड केली आहे.
महामंडळाची स्थापना झाल्यानंतर लगेचच ललित गांधी यांना राज्यमंत्र्यांचा दर्जाही दिला गेला.
परंतु खात्यावर रूपयाही वर्ग न करतना त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ललित गांधी यांनीही लगेच कोल्हापूर आणि सांगली येथे कार्यालयाचे उद्घाटन केले. परंतु ही दोन्ही कार्यालये दुसर्याच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. सांगलीत मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयाची धूळ कधी झाडली आहे हे माहित नाही एवढी अस्वच्छता तेथे आहे. तीन कामगारांवर हे कार्यालया सुरू आहे. मौलाना आझादच्या कर्मचार्यांवरच जैन महामंडळचे काम सुरू आहे. तेथे माहिती घेतली असता अजून आम्हाला कोणतेच आदेश आले नाहीत. पूर्वीपासूनच जैन समाजाचे काम मौलाना आझाद या महामंडळामार्फतच चालते अजूनही तेच सुरू आहे.
ललित गांधी यांनी मोठ्या उत्साहाने अध्यक्षपदाची ध्ाुरा हाती घेवून राज्यभर दौरा सुरू केला आहे.
परंतु अद्याप ठोस असे काहीच या महामंडळाला मिळाले नाही. वर्षअखेरीचे दिवस आहे. अजून राज्य सरकारचे बजेट आले नाही. या बजेटमध्ये काही तरतूद झाली तर बरे आहे नाही तर पुढील वर्षही वाया जाणार आहे.जैन महामंडळाच्या कार्यालयाला स्वतंत्र जागा हवी परंतु गडगड करून दुसर्याच्या बोर्डाबरोबर जैन महामंडळाचे बोर्ड लावण्यात आले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



