दिनेशकुमार ऐतवडे
tanajirao savant news : सावंतांनी विमान उतरवले, पण दादांनी आकाशात विमान ताटकळत ठेवले होते : माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बँकाँकला जात असताना असताना मध्येच विमान वळवून चेन्नईला लँड करण्यात आले. ऋषिकेश सावंतच नव्हे तर केवळ वैमानिकाला विमान परत येत आहे तेवढच माहित होते इतर प्रवाशांना काहीच कळाले नाही. असा प्रसंग माजी मुख्यमंत्री वसंतदादांनी घडवून आणला होता त्याचाच किस्सा….
tanajirao savant news : सावंतांनी विमान उतरवले, पण दादांनी आकाशात विमान ताटकळत ठेवले होते
वसंतदादा पाटील राज्यातील एक वजनदार नेते होते. सांगलीत बसून राज्यातील काँग्रेसचे उमेदवार ते फायनल करीत असता. सांगलीत बसून त्यांनी एकेकाळी काँग्रेसचे 189 उमेदवार निवडून आणत असतात. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. परंतु एकदा विधानपरिषदेची निवडणूक लागली. दादांनी मुंबईतील एका नेत्याचे नाव विधानपरिषदेसाठी जाहीर केले. परंतु दिल्लीत पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी वर्धा येथील सुबोध मोहिते यांचे नाव विधानपरिषदेसाठी फायनल केला. दादांना हो मोठा धक्का होता.
विधानपरिषदेसाठी मुंबईत अर्ज दाखल करायचे होते. सुबोध मोहिते नागपुरात होते.
नागपूर ते मुंबई विमान उपलब्ध नसल्याने सुबोध मोहिते यांनी नागपूर ते पुणे यायचे आणि पुण्याहून मोटारीने मुंबई गाठून अर्ज दाखल करायचे असे नियोजन केले. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सुबोध मोहिते नागपुरातून विमानाने पुण्याकडे रवाना झाले. परंतु दादांच्या मनाला ही गोष्ट पटणारी नव्हती राजकारणात माहिर असणार्या दादांनी नवा डाव टाकला आणि त्यांनी डावपेच आखण्यास सुरूवात केली. पुण्यात विमान आल्यानंतर आपली सर्व यंत्रणा वापरली आणि विमानाला दुपारी तीन वाजेपयंर्ंंत पुण्यात उतरूच दिले नाही. त्यामुळे विमान आकाशात रेंगाळतच राहिले.
इकडे दादांचा माणूस मुंबईत तयार होताच त्यांनी तीनला पाच मिनिटे कमी असताना उमेदवारी अर्ज दाखल केला.
अशा तर्हेने वसंतदादांनी इंदिरा गांधींना न दुखावता आपला माणूस विधानपरिषदेवर निवडून आणला. दादांच्या या मुत्सद्देगिरीची आज पुन्हा एकदा या घटनेने आठवण झाली.
सोमवारी माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंतही घरात कोणालाही न सांगता खासगी विमानाने बँकाँक गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकारणात माहिर असणार्या तानाजीराव सावंत यांनीही दादांच्या पावलावर पाउल ठेवत. नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ आणि इतर सरकारी यंत्रणांना हाताशी धरून आपल्या मुलांचे विमान वरच्या वर वळवून पुन्हा माघारी उतरविले. या घटनेने दादांच्या विमानाची आठवणही पुन्हा एकदा ताजी झाली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











