jain samaj news : जैन महामंडळातर्फे शैक्षणिक आणि व्यावसायिक कर्ज योजना : महाराष्ट्र शासनाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी जैन समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी ’जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करून महामंडळ स्थापन केलेही
jain samaj news : जैन महामंडळातर्फे शैक्षणिक आणि व्यावसायिक कर्ज योजना
आता या महामंडळामार्फत जैन समाजासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यात येणार आहेत. त्यापैकी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना आणि व्यापार्यांसाठी व्यावसायिक कर्ज योजना या दोन महत्वाच्या योजना आहेत.
महाराष्ट्र शासनाने या महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांची नियुक्ती केली तसेच सदस्यपदी सांगलीचे रावसाहेब पाटील यांचीही निवड केली. नुकतेच सांगलीत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात याचे कार्यालयही उघडण्यात आले आहे.
महामंडळाच्या योजनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
शैक्षणिक कर्ज सहाय्य:
जैन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्यांतर्गत आणि देशांतर्गत अभ्यासक्रमांसाठी 10 लाख रुपये, तसेच परदेशी अभ्यासक्रमांसाठी 20 लाख रुपये पर्यंत बँक कर्जावर कमाल 8% व्याजदरापर्यंत सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल
व्यवसायिक कर्ज योजना:
जैन समाजातील उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी थेट कर्ज योजना उपलब्ध करून दिली जाईल. हप्ते वेळेत भरल्यास व्याजमाफीचा लाभ मिळू शकतो
रोजगार मेळावे:
जैन समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा उद्देश आहे महामंडळाच्या अधिकृत योजनांची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.