जैन समाजाच्या विकासासाठी महामंडळ प्रयत्न करेल : तृप्ती धोडमिसे
jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या सांगली कार्यालयाचे उद्घाटन : राज्य शासनाने जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्यामुळे समाजाचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या 100 वर्षांतील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी असून, याचा जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या सांगली कार्यालयाचे उद्घाटन
येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याहस्ते झाले. यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील, काकासोा धामणे, अजित शिराळकर, कमल मिणचे, अॅड जयंत नवले, पोपटलाल डोर्ले उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, धार्मिक, वैचारिक आणि सैद्धान्तिक अधिष्ठान असलेल्या जैन समाजाला खूप मोठी परंपरा आहे. जैन समाजाकडून इतर समाजाने खूप सार्या गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत. महामंडळाच्या माध्यमातून समाजाचा नक्कीच विकास होईल.
रावसाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील गरीब, गरजू जैन बांधवांसाठी महामंडळाची अत्यंत गरज होती. ललित गांधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपण सर्व समाजाला बरोबरीने घेऊन जाल, अशी अपेक्षा आहे. आपल्या सकारात्मक गोष्टींना दक्षिण भारत जैन सभेचे सर्वतोपरी सहकार्य राहील.
मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.
खजिनदार संजय शेटे यांनी आभार मानले. यावेळी महावीर खोत, अंजली कोले, संदीप हिंगणे, विनोद पाटील, प्रशांत अवधूत, प्रवीण वाडकर, अनिल हवाणे, अनिता पाटील, अनिता पाटील, छाया कुंभोजकर, सुनीता चौगुले, मंगल चव्हाण, वीणा आरवाडे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
शेतकरी, व्यापार्यांना मदत करणार : रावसाहेब पाटील
देशातील इतर समाजांपक्षा महाराष्ट्रातील जैन समाजात शेतकरी, छोटे व्यापारी आहेत. शेतकरी, छोट्या व्यापार्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



