अॅड उल्हास चिप्रे यांची माहिती
jain samaj news : सांगलीतील पद्मावती कॉलनीत बुधवारपासून पंचकल्याण महोत्सव: येथील नेमिनाथथगर धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीजीत पार्श्व-पद्मावती दिगंबर जैन मंदिरात बुधवारी (दि. 30) पासून पाच दिवसांचा पंचकल्याण महामहोत्सव सुरु होत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. उल्हास चिप्रे यांनी दिली.
jain samaj news : सांगलीतील पद्मावती कॉलनीत बुधवारपासून पंचकल्याण महोत्सव
पद्मावती कॉलनीत 2006 ला मंदिर उभारणी करण्यात आली. त्यावेळी देवनंदी महाराजांचा चातुर्मास झाला होता. जैन फाउंडेशनने त्याचे नियोजन केले होते. कॉलनीमध्ये जिनमंदिर व्हावे, अशी इच्छा श्रावक-श्राविकांनी व्यक्त केली. देवनंदी महाराजांनी अनुमोदन दिले. पद्मावती कॉलनी विकसीत करताना मंदिरासाठी जागा राखून ठेवली होती. देवनंदी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपूजन झाले. मूल नायक भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.
पंचकल्याण झाले. मानस्तंभ 2018 ला पूर्ण झाला, मात्र महापूर आणि कोरोना संकटामुळे काम लांबले. गेल्यावर्षी गावभागात चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सुयश गुप्तजी महाराज आले होते. त्यांना पार्श्व पद्मावती परिसरातील पंचकल्याण पूजेचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्विकारले. अपुरे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावला, श्रम घेतले.
jain-samaj-news-panchkalyan-festival-begins-in-padmavati-colony-sangli-from-wednesday
महावीर जिनबिंब शिखर व मानस्तंभ चतुर्मुख जिनबिंबाचे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव 30 एप्रिल ते 4 मे या काळात होत आहे. बुधवारी ध्वजवंदन, मंगलकुंभ स्थापना, गर्भकल्याणक पुजा विधान आदी कार्यक्रम होतील. गुरुवारी (दि. 1) जन्मकल्याण विधानासह विविध कार्यक्रम, शुक्रवारी (दि. 2) मौजबंधन संस्कारासह विविध कार्यक्रम, शनिवारी (दि. 3) केवलज्ञान कल्याण सोहळ्यासह विविध कार्यक्रम होती. रविवारी (दि. 4) निर्वाणकल्याण, अभिषेक व विविध कार्यक्रमानंतर विसर्जन केले जाईल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.