rajkiyalive

jat vidhansabha news : जतमधून भाजपकडून गोपीचंद पडळकर भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;

फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी

मुंबई :

jat vidhansabha news : जतमधून भाजपकडून गोपीचंद पडळकर भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपच्या दुसर्‍या यादीतही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

jat vidhansabha news : जतमधून भाजपकडून गोपीचंद पडळकर भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;

भाजपच्या दुसर्‍या यादीत भाजच्या दुसर्‍या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या दुसर्‍या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेंच सुरु आहे. महाविकास आघाडीतही अनेक जागांवरुन खल सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. पुढील फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपात पुन्हा एकदा भाजपकडून 9 आकड्याचे गणित जुळण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप मुंबईत 18 जागा लढवणार आहे. भाजपकडून 14 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत, तर अद्यापही 4 जागांवर उमेदवार निश्चिती बाकी आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज