rajkiyalive

JAYANT PATIL : सांगलीवाडी ते सावळवाडी रस्त्याच्या 11 कोटी 36 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

सांगली
JAYANT PATIL : सांगलीवाडी ते सावळवाडी रस्त्याच्या 11 कोटी 36 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन : मिरज तालुक्यातील सांगलीवाडी ते सावळवाडी या रस्त्याचे आ.जयंत पाटील यांच्याहस्ते नुकतेच कवठेपिरान येथे भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी 11 कोटी 36 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी गावातील 3 विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कवठेपिरान येथील स्वराज्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उदघाटन करण्यात आले.

JAYANT PATIL : सांगलीवाडी ते सावळवाडी रस्त्याच्या 11 कोटी 36 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

याप्रसंगी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,उपाध्यक्ष विजयराव यादव, आनंदराव नलवडे (भाऊ),सांगलीचे संजय बजाज,स्वराज्य पतसंस्थेचे संस्थापक,युवा उद्योजक सचिन पाटील,पतसंस्थेचे अध्यक्ष सतिश पाटील,उपाध्यक्ष प्रकाश जाधव, उद्योजक भालचंद्र पाटील,सुरेश पाटील, माजी सभापती दत्तात्रय पाटील,श्रीबाळ वडगावे प्रामुख्याने उपस्थित होते.

आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सावध रहा,दक्ष रहा.

कारण सत्ताधारी मंडळी आता आपणास आकाशातील चंद्र-तारे सुध्दा तोडून आणून देण्याचे आश्वासन देतील,असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी कवठेपिरान येथील समारंभात बोलता ना दिला. आपल्या संस्थेचा कारभार पारदर्शी असेल,तर कोणत्याही चौकशीनंतरही कोणा च्या दारात उभा रहाण्याची गरज लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आ.पाटील म्हणाले की,सांगली जिल्ह्यात 32 सहकारी बँका असून त्यातील 18 बँका चांगल्या चालल्या आहेत.

काही बँका विलीन झाल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकेतील पैसे आता सहकारी बँकांकडे वळत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून ग्राहकांना तत्पर,नम्र सेवा देत त्यांचा विश्वास संपादन करा.

प्रा.शामराव पाटील म्हणाले,अलिकडे सहकारी पतसंस्था व बँका चालविणे अवघड बनले आहे.

संस्थेचा कारभार पारदर्शी व काटकसरीचा करून संस्थेच्या प्रगतीस गती द्यावी. आपल्या संस्थेची विश्वासार्हता असेल, तर ठेवीदार आपल्याकडे पैसे ठेवतात.यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी युवा उद्योजक सचिन पाटील यांनी स्वागत,तर पतसंस्थेचे संचालक प्रताप गुरव यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,इस्लामपूरचे शहाजी पाटील,सांगलीचे राहुल पवार,डॉ.पृथ्वीराज पाटील,तुंगचे भास्कर पाटील,बाळासाहेब केरीपाळे,राजेंद्र तामगावे, प्रकाश सावर्डे, रमेश पाटील, संदीप पाटील, दादासो तामगावे, रोहित साळुंखे, वैभव पाटील, सुरेश पाटील, रावसाहेब मडके, शंकर सावंत यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. ऋषिकेश पाटील यांनी आभार मानले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज