jayant patil news : आ.जयंतराव पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता : नितेश कराळे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राज्याच्या सर्वोच्चपदी बसू शकतात. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ता नितेश कराळे यांनी रेठरेहरणाक्ष येथील जाहीर सभेत बोलताना केले.
jayant patil news : आ.जयंतराव पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता : नितेश कराळे
राज्यसरकारने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महिला, शेतकरी, युवकासाठी जाहीर केलेल्या योजना फसव्या आहेत. ही गद्दारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी शक्तींच्या विरोधातील लढाई आहे. राज्याचा स्वाभिमान मातीत घालणार्यांना मातीत गाडा असे आवाहनही त्यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संग्राम जाधव, सरपंच शुभांगी बिरमुळे, उपसरपंच अभिजित मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.कराळे म्हणाले, भाजपा भ्रष्टाचारी पार्टी झाली आहे. भ्रष्ट नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये साफ करून पक्षात घेत आहेत. मालवणचा छत्रपतींचा पुतळा पडला कारण यांनी त्यातही पैसे खाल्ले. हा केवळ पुतळा पडला नाही, तर त्यांनी आपला स्वाभिमान मातीमोल केला आहे. शेतकर्यांच्या शेतीमालास चांगला दर देण्याचे जाणीवपूर्वक टाळत आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात पळवीत आहे.
हे का विरोध करीत नाहीत? राज्यात महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. मोदी-शहांनी अनेक संस्था, उद्योग मोडीत काढले. मी पवारसाहेबांबरोबर राज्यात फिरत आहे. 84 वर्षाचा योध्दा सर्वसामान्य माणसांचे सरकार आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहे. संपूर्ण राज्यातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निश्चित महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. बी.जी.पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीवर आपला प्रपंच चालला आहे. हा सहकार मोडण्याचा सत्ताधार्यांचा डाव आहे.
जातीयवादी आणि गद्दारांचा राज्याला मोठा धोका आहे. आपण क्रांतिकारकांचे वारसदार आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीस मतदान करून हा धोका परतवून लावूया. संचालक दादासाहेब मोरे, दिलीपराव मोरे, कृष्णेचे संचालक जे.डी.मोरे, सुजित मोरे, धनाजी बिरमुळे, विवेकानंद मोरे, सुरेश पवार, अविनाश मोरे, जयवंत मोरे, पतंगराव मोरे, सुहास पवार उपस्थित होते. माजी उपसरपंच उमेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप जाधव यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



