विरोधकांच्या अपप्रचाराला फसू नका
jayant patil news : कोरोना, महापूराच्या संकटकाळात आ.जयंतराव पाटील यांचा सामान्यांना मदतीचा हात : प्रतिक पाटील: कोरोना, महापूराच्या संकटाच्या काळात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी अहोरात्र कष्ट घेत सामान्य माणसांना धीर दिला, मदतीचा हात दिला. त्यावेळी आपण कुठे होता? असा सवाल युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी प्रचार दौर्यात बोलताना केला. सलग 35 वर्षे कार्यकर्ते व सामान्य माणसांचे प्रेम, आशिर्वाद मिळविणे सोपे नाही. त्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागते असा टोलाही त्यांनी दिला. विरोधक अपप्रचार व दिशाभूल करीत आहेत, त्यास फसू नका असे आवाहनही त्यांनी केले.
jayant patil news : कोरोना, महापूराच्या संकटकाळात आ.जयंतराव पाटील यांचा सामान्यांना मदतीचा हात : प्रतिक पाटील
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी वाळवा तालुक्यातील बोरगाव, शिगाव, भडकंबे, गोटखिंडी, मिरज तालुक्यातील दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, मौजे डिग्रज, तुंग, कवठेपिरान गावांचा प्रचार दौरा केला. आपण गेल्या काही महिन्यात मतदारसंघातील 25 पाणंद रस्ते केल्याचेही सांगितले. प्रतिक पाटील म्हणाले, कोरोना व महापूराच्या काळात जे-जे करणे आवश्यक आहे, ते-ते आपण केलेले आहे.
साहेबांनी सांगली जिल्ह्यात सुरू केलेला मॉडेल स्कुल, स्मार्ट पीएचसी हे प्रकल्प राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविले जात आहेत. साहेबांनी मतदारसंघात 500 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विरोधक मात्र आपण केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. गाफील राहू नका.
साहेबांचे काम आणि तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यत पोचवा. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर पंचसूत्रीच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी व सामान्य माणसाच्या विविध कल्याणकारी योजना राबविणार आहोत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



