आबांवरील आरोपांवर जयंत पाटलांचा हल्लाबोल
मुंबई :
jayant patil news : फडणवीसांनी अजित पवारांना बोलवून आरोपांची फाईल दाखवली हा दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार : सिंचन घोटाळ्यातील फाईलवर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी, असे सांगत फाईलवर सही केली होती, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हयात नसलेल्या व्यक्तीबाबत बोलताना योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
jayant patil news : फडणवीसांनी अजित पवारांना बोलवून आरोपांची फाईल दाखवली हा दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार
जयंत पाटील यांनी सांगितले की, आज आबा हयात नाहीत. एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधान त्यांच्या बाबतीत करणे आणि त्या माणसाला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. आबा किती स्वच्छ होते, किती चांगल्या प्रतिमेचे होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. डान्सबार बंदी करण्यात आबांचा किती पुढाकार होता हे महाराष्ट्राला माहिती आहे.
दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार
पाटील यांनी सांगितले की, ते महाराष्ट्रातील लोकप्रिय गृहमंत्री होते आणि त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली. ती सही असलेली फाईल सरकार बदलल्यावर ज्यांच्यावर आरोप होते त्यांना बोलावलं आणि त्यांना फाईल दाखवली. म्हणजेच त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना बोलवून त्यांची फाईल दाखवली म्हणजे या राज्यामध्ये काय चाललंय आहे? मी आरोप करायचे फाईल आल्यावर ज्याच्यावर मी आरोप केले त्यालाच फाईल दाखवायची म्हणजे दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार आहे. अशी पद्धत असते का? आणि अजितदादांनी त्यांनाच ती फाईल बोलून दाखवली तर ती एवढी स्टोरी एवढी सांगायची नव्हती आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांनी अडचणीत आणलं आणि हे दोघं कसे सच्चे मित्र आहेत हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळालं. वारंवार तिकडे जाऊन शपथ घेण्याचा जो प्रयत्न आहे तो त्याचाच एक भाग आहे असे मला वाटते, असा खोचक टोलाही लगावला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.