jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये खात्यावर जमा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने चारही युनिटकडे दि.15 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसास रक्कम रुपये 87 कोटी 6 लाख 55 हजार 708 हे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी दिली. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,ऊसतोड मजूर यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम सन 2024-25 मधील 20 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये खात्यावर जमा
श्री.पाटील म्हणाले, साखराळे,वाटेगाव- सुरुल,कारंदवाडी युनिटमध्ये दि.16 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबरमध्ये 39 हजार 170 मे. टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याचे प्रति टन रुपये 3 हजार 200 प्रमाणे रुपये 12 कोटी 53 लाख 44 हजार हे दि.30 डिसेंबर 2024 रोजी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. दि.1 डिसेंबर ते दि.15 डिसेंबरमध्ये तीन युनिटमध्ये 2 लाख 2 हजार 48 मेट्रीक टन ऊस गाळप केलेला आहे. त्याचे प्रतिटन रुपये 3 हजार 200 प्रमाणे रुपये 64 कोटी 65 लाख 55 हजार 5 रुपये दि. 9 जानेवारी 2025 रोजी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत.

तसेच तिप्पेहळ्ळी-जत युनिटकडे दि.16 नोव्हेंबर ते दि.30 नोव्हेंबरमध्ये 32 हजार 918 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याचे प्रतिटन रुपये 3 हजार प्रमाणे रुपये 9 कोटी 87 लाख 56 हजार 703 हे दि.8 जानेवारी 2025 रोजी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत.
आजअखेर चारही युनिटमध्ये 7 लाख 19 हजार 30 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. यातून 7 लाख 93 हजार 710 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. आम्ही लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचाराने,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ऊस उत्पादक शेतकर्यांचे हित जपण्याचे काम करीत आहोत. शेतकर्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक देवराज पाटील, विठ्ठल पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील,चिफ अकौंटंट संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



