rajkiyalive

JAYANT PATIL NEWS : जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल,

सांगली : कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल, एवढ्या खालच्या पातळीवर जावू नका, एवढीच त्यांना सुचना. सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणार्‍या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

JAYANT PATIL NEWS : जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल,

दोन वर्षे माणूस शांत असतो. अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते हा काही योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खुश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल. निवडणूक आहे त्यामुळे काही लोकांनी साम दाम दंड भेद वापरायचे ठरवलेले दिसतंय. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहितं, कुणाच्या सांगण्यावरून लिहितंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. जनता योग्य उत्तर देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्र व्यवहार सुरू आहे हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत. त्यामुळे वाझे यांनी पत्रात काय लिहिले ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील याचा मला विश्वास आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज