rajkiyalive

jayant patil news : जयंत पाटील लाखाच्या मतांनी विजयी होतील.

dineshkumar aitawade

jayant patil news : जयंत पाटील लाखाच्या मतांनी विजयी होतील. फार वेळ उभा राहता येत नसताही वाळव्याचे ज्येष्ठ नेते दिलीपतात्या पाटील यांनी आपल्या मुलूख मैदानी तोफेतून विरोधकांचे धोबीपछाड केले. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मिरज तालुक्यातील तुंग येथे झाला. मारूतीरायाचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ नेते दिलीपतात्या पाटील यांची तोफ जोरदार कडाडली.

jayant patil news : जयंत पाटील लाखाच्या मतांनी विजयी होतील.

स्थानिक प्रश्नापासून ते राष्ट्रीय प्रश्नापर्यंत तात्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जयंत पाटील हे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत 1 लाखाच्या वर मतांनी निवडून येणार यात काही शंका नाही. मी काही ज्योतिषी नाही परंतु मी वास्तव सांगतो. जयंत पाटील यांना राज्याच्या सर्वोच्य पदावर बसविण्यासाठी आपण सर्वजण 14 दिवस रात्र राबूया. जयंत पाटील यांना मी लहानपणापासून ओळखतो. गोडबोलून विरोधकांना कसे गप्प बसवायचे हे त्यांना ठरवायचे. त्यांनी मोठे केलेले पिल्लू आज गुरगुरू लागले आहे.

त्याला वेळीच ठेचेणे आवश्यक आहे. विरोधक कितीही असले तरी त्यातील 50 टक्के लोक जयंत पाटील यांना कधी भेटून जातात हे कुणालाच कळणार नाही. दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात सदाभाउ खोत, निशिकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. 35 वर्षे जयंत पाटील यांनी काय केले हे विचारणारे निशिकांत पाटील हे 25 वर्षे जयंत पाटील यांच्याबरोबरच होते. त्यावेळी ते काय करत होते. आता जाकीट घालून मिरवत आहेत.

सदाभाउ खोत यांनी मंत्रीपद गेल्यावर आमच्या घराकडे आता कुत्रेसुध्दा बघत नाही, असे म्हणत होतेे. आता आमदारकी मिळाल्यावर त्यांना महायुतीचा पुळका येत आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ आहे. कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचे किमान 1 लाखांनी विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणार्‍या 14 दिवसात मी रात्रंदिवस जयंत पाटील यांच्यासाठी झटणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज