jayant patil news : 10 वर्षात राज्य व देशात भाजपा सरकार असताना पेठ-सांगली रस्त्यास विलंब का? ः आ.जयंतराव पाटील

SHARE:

मी आजपासून राज्याच्या प्रचार दौर्‍यावर, मतदारसंघ सांभाळा

इस्लामपूर
गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्‍याला दोष कसा देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधान सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांनी तुंग येथील प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केला. हा मतदारसंघ तुमच्या हवाली करून मी आजपासून राज्याच्या प्रचार दौर्‍यावर जात आहे. प्रत्येकाने आपले गांव,बूथ सांभाळा, विजय आपलाच आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री.हनुमानाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

jayant patil news : 10 वर्षात राज्य व देशात भाजपा सरकार असताना पेठ-सांगली रस्त्यास विलंब का? ः आ.जयंतराव पाटील

याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, आष्टयाचे नेते वैभव शिंदे, युवा नेते प्रतिक पाटील, आनंदराव नलवडे, उद्योजक भालचंद्र पाटील, माजी सभापती वैभव पाटील, महावीर चव्हाण,  माजी महापौर मैमुद्दीन बागवान, सरपंच विमल सुर्यवंशी, भास्करराव पाटील, सचिन पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, अँड.चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, बी.के.पाटील, डॉ.प्रताप पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील, काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे, अ‍ॅड.आर.आर.पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, आरपीआयचे प्रताप मधाळे, दलित महासंघाचे शंकर महापुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, मी एकदा विना टोल पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकर-तीन पदरीकरण केले होते. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी हा रस्ता केंद्राकडे वर्ग केला. त्यामुळे आपले 2019 ला काही वर्षे सरकार आल्यानंतर हा रस्ता करता आला नाही. मी स्वतः केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या रस्त्याची मागणी केली आणि पाठपुरावा केला आहे. भाजपा महायुतीने राज्याची मोठी अधोगती केली आहे. मुलांच्या हाताला काम नाही,

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. महागाईने कळस गाठला आहे, भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला आहे. महिला सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. राज्य वाचवण्यासाठी भाजपा महायुतीस सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा. दिलीपतात्या पाटील म्हणाले, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष उमेदवारी मिळण्यासाठी दुसर्‍या पक्षात गेला आहे. जॅकेट घालून आमदार होता येत नाही. वैभव शिंदे म्हणाले, आपण आष्टयाची चिंता करू नका. आम्ही किती मताधिक्य देतो, ते पहा. बी.जी.पाटील म्हणाले, आम्ही आरक्षण मागितले म्हणून आमच्या पाठीत काठ्या घातल्या, त्याचा बदला घ्यायचा आहे.

अमित शहा राज्यातील सहकार मोडीत काढण्यास निघाले आहेत. अ‍ॅड.चिमण डांगे म्हणाले, ज्यांनी 28 वर्षे आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले, ते आता विचारतात, 35 वर्षात काय केले? भालचंद्र पाटील म्हणाले, आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या 8 गावांचा विकास झाला असून आम्ही त्यांना मोठे मताधिक्य देऊ. सुस्मिता जाधव म्हणाल्या, लोकसभेच्या दणक्यानंतर राज्यातील महिला लाडक्या बहिणी झाल्या, मात्र राज्यात महिला सुरक्षित आहेत का?

भास्करराव पाटील म्हणाले, आ.पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आमच्या गावच्या हनुमान देवस्थानास ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. बी.के.पाटील, शहाजी पाटील, अ‍ॅड.आर.आर.पाटील, वैभव पाटील, कविता पाटील, एस.के.पाटील, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे, संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, अभिजित पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, संजय चव्हाण, भरत देशमुख, प्रा.बाळासाहेब मासुले, रामभाऊ मासाळ, रामभाऊ लाड, श्रीबाळ वडगावे, दत्ता पाटील, रविंद्र माणगावे, राहुल माणगावे, रमेश निर्वाणे, नितीन दणाणे, विकास कदम, प्रमोद आवटी, संभाजी गावडे, विजय आडमुठे, विलास आवटी, संजय शिंदे, झुंझारराव पाटील, विराज शिंदे, वैभव शिंदे, छाया पाटील, उज्ज्वला पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप कुडचीकर यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *