पक्षविरोधी भूमिका घेणार्यांवर कोणी विश्वास ठेवू नये
jayant patil news : जयंत पाटलांच्या विजयासाठी इस्लामपुरात राष्ट्रीय काँग्रेस सरसावली: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी इस्लामपूर येथे बैठक घेऊन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा मुख्य घटक पक्ष आहे. मात्र कोणीतरी वर्तमानपत्रात बातम्या देऊन अथवा चॅनेलवर बाईट देऊन वेगळी भूमिका घेत असेल, तर त्यांना पक्षविरोधी भूमिका घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.
jayant patil news : जयंत पाटलांच्या विजयासाठी इस्लामपुरात राष्ट्रीय काँग्रेस सरसावली
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस अँड.मनीषा रोटे, इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अँड. आकीब जमादार, जिल्हा प्रतिनिधी अँड.आर.आर. पाटील, स्वयंरोजगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, महिला तालुकाध्यक्षा रंजना माळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, आम्ही आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रीय आहोत. कोणी वेगळी भूमिका घेऊ नये. आ.जयंत पाटील हे सुसंस्कृत, अभ्यासु, निष्ठावान आणि कर्तृत्ववान नेते आहेत. आम्ही त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू.
अँड.मनिषा रोटे म्हणाल्या, या सरकारने महिलांना पंधराशे रुपयांचे प्रलोभन दिले आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 3 हजार देवू. शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे म्हणाले,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासो पटोले, आ.विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील यांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहे. सुरेश कांबळे, भाऊसाहेब पाटील, हिंमत कांबळे, सोनम पाटील, संदीप मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.