jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील : राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेला सन्मान आपणा सर्वांना अभिमानास्पद असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रतिक पाटील यांचे कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत करून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील
प्रतिक पाटील यांनी अल्पावधीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत नेत शेतकर्यांचे जीवन सुसह्य केल्याबद्दल त्यांचा आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान केला आहे. याबद्दल राजारामबापू सह.साखर कारखान्याच्या वतीने विजयराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, राजेंद्र चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिक पाटील सत्कारास उत्तर देताना म्हणाले, हा केवळ माझा एकट्याचा सन्मान नसून हा आपल्या सर्व टीमचा सन्मान आहे.
आपल्या सभासद शेतकर्यांचा, कामगारांचा, हितचितकांचा सन्मान आहे. राजारामबापू समूह हा आपला एक परिवार असून आ.जयंतराव पाटील हे आपले कुटुंब प्रमुख आहेत. भविष्यातही स्व.बापूंच्या विचाराने शेती व सहकार क्षेत्रात भरीव काम करू. बाळासाहेब पवार म्हणाले, प्रतिक पाटील यांनी केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रथम शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला आहे. त्यांनी ठिबक सिंचन योजना, सच्छिद्र निचरा प्रणाली योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यांनी शेतकर्यांच्या शेतातील एकरी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केलेला आहे.
विठ्ठल पाटील म्हणाले, प्रतिक पाटील शेतकर्यांसाठी नवनव्या योजना राबवित आहेत.
त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात नवा उत्साह संचारला आहे. संचालक प्रदीपकुमार पाटील, दादासाहेब मोरे, शैलेश पाटील, रघुनाथ जाधव, प्रताप पाटील, दिलीपराव देसाई, अमरसिंह साळुंखे, अतुल पाटील, वैभव रकटे यांनी प्रतिकदादांचे अभिनंदन केले. संचालक दीपक पाटील, रमेश हाके, बबनराव थोटे, राजकुमार कांबळे, हणमंतराव माळी, कामगार प्रतिनिधी विकास पवार, मनोहर सन्मुख, सचिव डी.एम.पाटील, कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालिका प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



