ncp sharad pawar news : वाळवा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व माजी मंत्री आ.जयंतराव पाटील समर्थक सरपंचांनी इस्लामपूर येथे भव्य बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चा काढून वाळवा पंचायत समितीवर जोरदार धडक दिली.
jayant patil news : इस्लामपुरात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा: सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून शेतकरी राजा हवालदिल आला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने म.गांधी रोजगार हमी योजना व शेतकर्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा,अन्यथा सरकार आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरेल,असा मोर्चा काढू,असा इशारा प्रमुख पदाधिकार्यांनी यावेळी दिला.
jayant patil news : इस्लामपुरात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,तालुका ध्यक्ष विजयराव पाटील,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
येथील तहसिल कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली. गांधी चौक,संभाजी चौक,आझाद चौक,झरी नाका मार्गे पंचायत समितीमध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकर्यांच्या कर्जमाफीसह शेतकर्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजप आ.बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकर्यांनी चांगला समाचार घेतला.
प्रा.वृषाली पाटील (कणेगाव),शंकरराव चव्हाण (सुरूल),हर्षवर्धन पाटील (रेठरे धरण),नागेश कदम (दुधारी),निवृत्ती माळी (कापुसखेड) या सरपंचांसह राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील,युवक तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर झोड उठविली.
Sharad Pawar NCP bullock cart and tractor march in Islampur
या आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव,उपाध्यक्ष माणिक पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव, संचालक शैलेश पाटील,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आटूगडे,आष्टयाचे दिलीपराव वग्याणी,विराज शिंदे,माणिक शेळके,महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात,माजी सभापती शैलजा पाटील,शुभांगी पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,संचालक विठ्ठल पाटील, दिपक पाटील,डॉ.अशोक पाटील,पोपटराव जगताप,शंकरराव पाटील,शंकरराव चव्हाण, बंडा नांगरे,राजेश पाटील,सुभाष भांबुरे, कल्पना गावडे,सुजाता डांगे यांच्यासह गावोगावचे सरपंच,राजारामबापू समूहातील संचालक,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता..

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.