ankali rasta roko news : शक्तिपीठ रद्दसाठी अंकलीत शेतकर्यांनी रोखला महामार्ग अन्यथा शेतकर्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई: खा. विशाल पाटील
shaktipith mahamarg andolan news : शक्तिपीठ रद्दसाठी अंकलीत शेतकर्यांनी रोखला महामार्ग: जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे. या महामार्गाला शेतकर्यांचा विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधीत शेतकर्यांनी कृषी दिनादिवशीच भरपावसात अंकली येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. या आंदोलनामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजुने वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. शासनाने जबरदस्तीने महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला तर शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई करू, असा इशारा खा. विशाल पाटील यांनी दिला.
shaktipith mahamarg andolan news : शक्तिपीठ रद्दसाठी अंकलीत शेतकर्यांनी रोखला महामार्ग
जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी शेतजमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. वास्तविक हा महामार्गाला शेतकर्यांचा विरोध आहे. तरी देखील शासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अनेक ठिकाणी मोजणी देखील बंद पाडल्या आहेत. पण शासन पोलीस बंदोबस्तात मोजणी करत आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी व महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शेतकर्यांनी मंगळवारी अंकली येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकर्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी खा. विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग होत आहे. आटपाडी, खानापूर कवठेमहांकाळ काही गावातील शेतकर्यांचा याला पाठिंबा आहे. विकासाला विरोध करायची भूमीका नाही. महामार्ग होत असेल तर चांगले आहे. पण शासन काम हाती घेत असताना पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. नदी काठच्या गावावरून महामार्ग जाणार आहे. त्यामुळे हा नवीन मार्ग बंधारा ठरणार आहे. नवीन मार्ग म्हणजे बंधारे आहे.
पुराचा धोका वाढू शकतो, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. तसा अभ्यास अधिकार्यांनी केला असेल तर सांगावे. शिवाय शेतकर्यांना नुकसान भरपाई जमिनीची किंमत किती देणार? हे जाहीर केले नााही. या महामार्गामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार असेल तर मी शेतकर्यांच्या बाजुने उभा असल्याचा इशारा खा. पाटील यांनी दिला.
shaktipith-mahamarg-andolan-news-farmers-in-ankali-blocked-the-highway-to-demand-the-cancellation-of-shaktipeeth
महेश खराडे म्हणाले, कृषी दिनी शेतकर्यांना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागत आहे ही शोकांतिका आहे. शक्तिपीठ महामार्गची कुणाचीही मागणी नाही तरीदेखील हा महामार्ग केला जात आहे. या महामार्गसाठी शासन 20 हजार कोटीचे कर्ज काढणार आहेत. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. केवळ ठेकेदार, आमदार, खासदार यांना जगविण्यासाठी हा महामार्ग सुरू आहे. पण आता प्रसंगी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहत्तर, पण शेतकर्यांना जमिनी आम्ही वाचवणार, असा इशारा दिला.
या आंदोलनात प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, शुभगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील, आदिनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोठा पोलीस बंदोबस्त; सहा जणांना अटक अन् सुटका
या आंदोलनामुळे सांगली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपाधीक्षक विमला एम. यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किरण चौगले, शहरचे निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकासह राखीव दला, जलद कृती दलाचे पथक तैनात होते.
दरम्यान, आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतीनाथ लिंबेकाई यांना अटक केली, त्यानंतर काहीवेळाने त्यांची सुटका करण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











