vita crime news : भांबर्डेतील युवकाच्या खूनप्रकरणी पाच जणांना आजन्म कारावास

SHARE:

vita murdar news : मुलांना रागविल्याच्या किरकोळ कारणावरुन युवकास लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून विटा येथील जिल्हा न्यायाधिश आणि अति. सत्र न्यायाधिश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी पाच जणांना आजन्म कारावास आणि 1 लाख 80 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

vita crime news : भांबर्डेतील युवकाच्या खूनप्रकरणी पाच जणांना आजन्म कारावास: याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आक्काताई यदू शिंदे (रा. भांबुर्डे ) यांनी फिर्याद दाखल केली होती. मारहाणीची घटना दि. 16 मे 2016 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली होती. सहा जणांनी केलेल्या मारहाणीत दिपक यदु शिंदे (वय 24, रा. भांबुर्डे ) याचा मृत्यू झाला होता. खटल्याच्या सुनावणीत सरकारपक्षातर्फे ड. ए. एम. साटविलकर यांनी काम पाहिले.

vita crime news : भांबर्डेतील युवकाच्या खूनप्रकरणी पाच जणांना आजन्म कारावास

विटा येथील जिल्हा न्यायाधिशांचा निकाल.

विक्रम शिवाजी शिंदे (वय 46), महेश दिनकर शिंदे (वय 50), तानाजी पांडुरंग शिंदे (वय 55 सर्व रा. भांबर्डे, ता. खानापूर), विशाल शिवाजी शिंदे (वय 44) आणि विश्वास गणपतराव भोसले (वय 55 दोघेही रा. विटा, ता. खानापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, खटल्याचे कामकाज सुरु असताना आरोपी बाळासो तातोबा शिंदे हे मयत झाले आहेत.

आरोपी महेश शिंदे हा आक्काताई यांचा चुलत पुतण्या आहे.

खटल्याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आक्काताई यांचा मुलगा दिपक आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. आरोपी महेश शिंदे हा आक्काताई यांचा चुलत पुतण्या आहे. महेश याच्या घरातच विक्रम शिंदे राहत होता. फिर्यादी आक्काताई आणि महेश यांचे घर काही अंतरावच आहे. तेथून जाणार्‍या रस्त्यावर विठ्ठल – रुक्मिणीचे मंदिर आहे. या मार्गावर विक्रम शिंदे यांची मुले शौचास बसत होती.

याबाबत वारंवार आक्काताई यांनी मुलांना तसेच विक्रम आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितले होते.

त्यावरुन त्यांच्यात सतत वाद होत असत. दरम्यान दि. 16 मे 2016 रोजी सकाळी आक्काताई यांनी त्यांच्या साड्या धुवून घराबाहेर वाळत घातल्या होत्या. सकाळी 10 च्या सुमारास विक्रम याच्या पत्नीने त्या सर्व साड्या फाडून टाकल्या. याचा जाब आक्काताई यांनी विचारल्यावर विक्रम हा त्यांच्या अंगावर धावून गेला.

यावेळी मयत दिपक हा घराबाहेर आला. त्यामुळे विक्रम त्याच्याशी वाद घालू लागला.

काही वेळाने विक्रम तेथून निघून गेला परंतु सायंकाळी 7 च्या सुमारास विक्रम हा अन्य पाच आरोपींना घेवून दिपक याच्या घराबाहेर आला. त्याने दिपक याला घराबाहेर बोलावले आणि सहाही जणांनी त्यास लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली. यावेळी आक्काताई यांचे पती यदु शिंदे हे मध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यानंतर सर्वजण चारचाकीतून निघून गेले.

vita-crime-news-five-people-sentenced-to-life-imprisonment-in-the-murder-of-a-youth-in-bhambarde

आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत दिपक हा बेशुध्द पडल्याने तसेच त्याच्या नाका – तोंडातून रक्त येऊ लागले. मात्र आरोपींच्या दहशतीमुळे कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यामुळे फिर्यादी आक्काताई यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दिपक यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. दिपक याच्या पोटातील शिरा तुटल्याने तसेच आतडड्याला भोक पडल्याचे निदान शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले. मात्र उपचार सुरु असतानाच दि. 21 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारापक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले.

यामध्ये फिर्यादी आक्काताई, मयत दिपक याचे वडिल यदु शिंदे, रेडीओलॉजिस्ट डॉ. पवार, पोलीस हवालदार कुमार वायदंडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सदरकामी तपासी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक स्वप्नील घोंगडे, पोलीस कर्मचारी प्रकाश निकम, मल्हारी खाडे, निलम जगदाळे, सांगली जिल्हा न्यायालयाच्या पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, रमा डांगे यांचे सहकार्य लाभले. न्यायालयापुढे आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्ती रविकिरण भागवत यांनी आरोपींना दोषी ठरवून आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी दिड लाख रुपये मयत दिपक यांची आई आक्काताई यांने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

फिर्यादी आक्काताई या अडाणी आहेत. त्यांची घरची परिस्थिती बिकट आहे. खटला सुनावणीस आल्यानंतर त्या नियमितपणे न्यायालयात हजर राहत होत्या. मध्यंतरी न्यायालयात येताना त्यांचा अपघात झाला तरीही त्या साक्षीकरिता हजर राहिल्या होत्या. मंगळवारी निकालाच्या दिवशीही आक्काताई न्यायालयात हजर होत्या. न्यायमूर्तींनी आरोपींंना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्यावर त्यांनी न्यायमूर्तींसमोर हात जोडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *