इस्लामपूर
jayant patil news : राज्य सरकारचे माता- भगिनी आणि मुलींवर पुतणा-मावशीचे प्रेम : जयंत पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर (ता. वाळवा) येथील ऐतिहासिक पुतळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने बदलापूर घटना आणि असंवेदनशील राज्य सरकारचा जोरदार जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते,कार्यकर्ते,तसेच शाळा-कॉलेजच्या विद्यार्थीनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नराधमाला फाशी द्या,चिमुकलेला न्याय द्या; लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको,सुरक्षा द्या;नको तुमचे दीड हजार,आम्हाला द्या सुरक्षाचा आधार या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
jayant patil news : राज्य सरकारचे माता- भगिनी आणि मुलींवर पुतणा-मावशीचे प्रेम : जयंत पाटील
आ.जयंतराव पाटील म्हणाले,बदलापूर घटनेचा निषेध करण्याबरोबर अशा घटना पुन्हा होऊ नयेत,राज्य सरकारला वचक बसावा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात मूक आंदोलन केले आहे. आज खरेतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र सरकार पुरस्कृत वकील न्यायालयात गेल्याने न्यायालयाने बंदला विरोध केला आहे. म्हणून आपण हा मूक निषेध नोंदवीत आहे. राज्य सरकार इव्हेंट व जाहिरातीत गुंग असून महिला-भगिनी आणि मुलींच्या सुरक्षेकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे. राज्य सरकारचे माता- भगिनी आणि मुलींच्यावर पुतणा-मावशीचे प्रेम आहे. सरकार महिलांची सुरक्षा करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे.
नराधमास कडक शिक्षा करावी,महिलांच्या सुरक्षे साठी राज्य सरकारने वेग-वेगळे उपाय करावेत,तसेच राज्यातील चिमुकल्या मुला-मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्राथमिक शाळेत महिलांना शिक्षक- शिक्षिकेत्तर कर्मचारी म्हणून संधी द्यावी,अशी आमची मागणी आहे.
प्रा.शामराव पाटील,नेताजीराव पाटील, आर.डी.सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,बाळा साहेब पाटील,संजय पाटील,खंडेराव जाधव, अरुण कांबळे,बी.ए.पाटील,अरुणादेवी पाटील,पै.भगवान पाटील,सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने,पुष्पलता खरात,मुनीर पटवेकर,सुभाषराव सुर्यवंशी,अँड.धैर्यशिल पाटील,संदीप पाटील,दादासाहेब पाटील, पुरोगामी आघाडीचे धनाजी गुरव,संजय बनसोडे,उमेश कुरळपकर,दलित महासंघाचे शंकर महापूरे,बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव,आष्टयाचे संग्राम फडतरे,संभाजी कचरे, शैलेश पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख, दिग्विजय पाटील,शिवाजी चोरमुले,सचिन कोळी,तसेच इस्लामपूर,आष्टा शहरांच्यासह तालुक्यातील गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक,महिला,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



