rajkiyalive

jayant patil news : आष्ट्यात आ.जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शिंदे प्रेमींचा निर्धार

आष्टा :

jayant patil news : आष्ट्यात आ.जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शिंदे प्रेमींचा निर्धार : आष्टा येथे स्व.माजी आमदार विलासराव शिंदे प्रेमी व निष्ठावंतांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने विलासराव शिंदे प्रेमी व निष्ठावंत उपस्थित होते. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करण्यात आला.

jayant patil news : आष्ट्यात आ.जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शिंदे प्रेमींचा निर्धार

वैभव शिंदे, झुंझारराव शिंदे, विशाल शिंदे, झुंझारराव पाटील, धैर्यशील शिंदे प्रकाश रुकडे, शैलेश सावंत, बाळासाहेब इंगळे,दिलीप सावंत,जितेंद्र पाटील, तानाजी सूर्यवंशी, नितीन झंवर, बाबासाहेब सिद्ध, झीनत अत्तार, रागिणी सावंत, भाग्यश्री शिंदे, स्नेहा माळी, सारिका मदने, विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजी ढोले, वरदराजे शिंदे, विश्वराज शिंदे तसेच मतदार संघातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत धैर्यशील शिंदे यांनी केले. झुंझारराव पाटील, अमर शेळके, तानाजी सूर्यवंशी, नितीन झंवर, झीनत अत्तार, स्नेहा माळी, नातू मुजावर, वरदराजे शिंदे, विश्वराज शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.

वैभव शिंदे म्हणाले 1978 साली स्व.विलासराव शिंदे आमदार झाले. पण 1980 नंतरच्या राजकीय घडामोडीनंतर जवळपास 15 वर्षे राजकीय संघर्ष करावा लागला. या काळात संयम काय असतो हे विलासराव शिंदे यांच्याकडून शिकता आले. नगर परिषद, मार्केट समिती, विविध संस्था या ठिकाणी विविध पदावर, विविध समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. बेरजेचे राजकारण करीत विकास कामे करण्याचे काम जयंत पाटील व विलासराव शिंदे यांनी एकत्रितपणे एका दिलाने केलेय. आता मात्र विरोधक आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय लाटत कोणताही कागदोपत्री पुरावा न देता श्रेय लाटत आहेत. नारळ फोडणार्‍यांना जनतेने कामाचा पुरावा मागितला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्हीच बसवणार तोही दिवसा. येणार्‍या काळात विरोधकांना जशाच तसे उत्तर दिले जाईल. जयंत पाटील गटाकडूनही मान सन्मान मिळाला पाहिजे. निष्ठावंत शिंदे प्रेमींना, कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांचा स्वाभिमान दुखावला नसला पाहिजे याची काळजीही संबंधितांनी घेतली पाहिजे. आभार विशाल शिंदे यांनी मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज