rajkiyalive

JAYANT PATIL NEWS : विशाळगडावरील घटना दुर्दैवी, हे सरकारचे मोठे अपयश : आ.जयंत पाटील

इस्लामपूर ः प्रतिनिधी

JAYANT PATIL NEWS : विशाळगडावरील घटना दुर्दैवी, हे सरकारचे मोठे अपयश : आ.जयंत पाटील : विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन समाजात जाणीवपुर्वक तेढ निर्माण केला जात आहे. हे सरकारचे मोठे अपयश आहे. ज्यांनी लोकांना तिथे बोलाविले,त्यांच्यासह दोषींच्यावर विना जामीन गुन्हे दाखल करायला हवेत. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने विशाळगडावरील गुंडशाही आणि झुंडशाहीचा जाहीर निषेध करतो,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे बोलताना दिली.

JAYANT PATIL NEWS : विशाळगडावरील घटना दुर्दैवी, हे सरकारचे मोठे अपयश : आ.जयंत पाटील

शिराळ्याचे आ.मानसिंगभाऊसह आमच्या पक्षाची 12 मते शेकापचे जयंत पाटील यांनाच

शिराळ्याचे आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्यासह आमच्या पक्षाची 12 ही मते शेकापचे जयंत पाटील यांना मिळालेली आहेत. आमचे कोणतेही मत फुटलेले नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी युवा नेते प्रतिक पाटील उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, गजापूर येथे अतिक्रमणाचा काही विषय नसावा. तरीही बाहेरून गेलेल्या लोकांनी अल्पसंख्यांकांच्या घरांची आणि प्रार्थनास्थळांची मोडतोड करून लोकांना मारहाण केली, लुटालूट केली हे गंभीर आहे.

तिथे काही पोलीस उभा होते, त्यांनी बघ्याची भूमिका न घेता जादा कुमक मागवायला हवी होती.

विशाळगड येथील अतिक्रमणे काढायला काही लोकांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. त्यांची अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वीच काढायला हवी होती. सध्या पाऊस सुरू असताना ही अतिक्रमणे काढणे, माणुसकीला धरून आहे का? गजापूरचे कृत्य कोणत्याही शिवप्रेमीलाही आवडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात अल्प अल्पसंख्याकांना अशी वागणूक कधी दिलेली नाही.

शेकापचे जयंत पाटील यांना आम्ही आमच्या पक्षाची 12 मते देण्याची ग्वाही दिली होती.

आम्ही आमच्या सदस्यांना मते कशी द्यायची हेही सांगितले होते. आम्ही आमच्या 10 आमदारांना त्यांना सूचक केले होते. वरच्या मतांची जुळणी करण्याची जबाबदारी त्यांचीच होती. सरकारने आरक्षणा बाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांशी चर्चा करताना त्यांना काय आश्वासने दिली आहेत, ते आम्हाला माहीत नाही.

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी साधारण 170-172 पर्यंत जाऊ शकते.

त्यांनी आम्हाला सांगायला हवे, आम्ही ही-ही आश्वासने दिली आहेत,आणि त्यांनी निश्चित अशा निर्णया पर्यंत पोचायला हवे. त्यांनी चर्चेला जाताना विरोधी पक्षाला सोबत न्यायला हवे होते. मी आजपासून पक्षाच्या वतीने जिथे आम्ही विधानसभेला लढणार आहोत, त्या जिल्ह्यांचा संपर्क दौरा करीत आहे. पहिल्या टप्प्यात सातारा, सोलापूर, जळगाव, धुळे, नाशिक, बीड, जालना, परभणी जिल्ह्यांचा दौरा करून दुसर्‍या टप्प्यात उर्वरित जिल्हे घेणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी साधारण 170-172 पर्यंत जाऊ शकते.

काही मतदारसंघ व्यवस्थित हाताळले, तर तिथेही आमचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

उद्या जे सरकार येईल,ते लवकरात लवकर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका घेईल. सध्या व्यवस्था भ्रष्ट झाली असून सर्वत्र पैशाचा सुळसुळाट वाढला आहे. लोकांना याचा त्रास होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज