rajkiyalive

JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय?

JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय?

दिनेशकुमार ऐतवडे

JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय? : अपेक्षेप्रमाणे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाउ खोत यांची विधानपरिषदेवर निवड झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाउंना दिलेला शब्द खरा करून दाखविला. त्यामुळे सदाभाउंना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. परंतु त्यांना मिळालेल्या बळामुळे जयंतरावांचा किल्ला भेदणार काय हाच मोठा प्रश्न आहे. येणार्‍या निवडणुकीत याचे उत्तर मिळेल.

JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय?

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि अजित पवार गटाच्या दोघांना विधानपरिषदेवर संधी मिळाली. या सर्वांमध्ये सर्वात नशिबवान ठरले ते मरळनाथपूरचे सदाभाउ खोत. त्यांना दुसर्‍यांदा विधानपरिषदेवर संधी मिळाल. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी दोन वेळा आमदारकी पदरात पाडून घेतली. भाजपनेही राज्याच्या राजकारणात अग्रेसर असणार्‍या जयंत पाटील यांना होमपीचवरच रोखण्यासाठी सदाभाउंना संधी दिली आहे. परंतु या अगोदरचा इतिहास पाहिला तर सदाभाउंचा उपयोग भाजपसाठी कितपत होईल हे सांगता येत नाही.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या पाठिशी राहण्याचे ठरविले.

अनेक आमदार सोडून गेले तरी ते डगमगले नाही. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे जयंत पाटील यांचे राज्याच्या राजकारणात वजन वाढले. त्यांची स्तुती नुकतेच अजित पवार यांनीही केली आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना सांगलीच्या होमपीचवरच रोखण्यासाठी भाजपने खेळी केली आहे. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

मित्र पक्षाला जागा दिल्यासारखेही झाले आणि जयंत पाटील यांना रोखण्यासाठीही सदाभाउंचा उपयोग होईल. परंतु गेल्या आठ वर्षात सदाभाउंनी जयंत पाटील यांच्यापेक्षा माजी खासदार असलेल्या राजू शेट्टींवरच तोंडसुख घेण्यात जास्त रस दाखविला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष महाविकास आघाडी असतानाही त्यांनी राजू शेट्टींचा पराभव कसा होईल याकडेच जादा लक्ष दिले. आता येणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांनीही इस्लामपूरची जागा रयत क्रांतीसाठी मागितली आहे.

दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील प्रत्येक गावात डिजिटल झळकावून आपणही विधानसभेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. महाडिक समुहाचे राहूल महाडिक, शिंदे गटाचे आनंदराव पवार, विक्रम पाटील, वाळव्याचे गौरव नायकवडी, कवठेपिरानचे भीमराव माने यांनीही आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात कोण हा प्रश्न नेत्यांबरोबरच नागरिकांनाही पडला आहे.

सदाभाउंना आमदारकी मिळाली याचा उपयोग ते जयंत पाटील यांच्या विरोधात करतात, आपला पक्ष वाढविण्यासाठी करतात की आणखी कशासाठी करतात ये लवकरच कळेल. सध्याच्या परिस्थितीत तरी सदाभाउंची आमदारकी जयंत पाटील यांच्यासाठी नवी नाही असेच चित्र आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज