JAYANT PATIL : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
JAYANT PATIL : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार
पक्षाच्या जेष्ठ,तरुण कार्यकर्त्यांसह पक्षाच्या सर्व घटकांना सोबत घेत वाळवा तालुक्या तील सर्व गावात वड,पिंपळ,लिंब आदी सावली देणारी १० हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. ‘वाढदिवस दादांचा,संकल्प वृक्षारोपणा’चा हे या अभियानाचे ब्रीद आहे. ही माहिती तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी दिली.
सध्या वाढते तापमान ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषण झपाट्याने वाढत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने अवकाळी पाऊस, जीवघेणा उकाडा यासारख्या दुष्परिणामांना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणा चा बिघडता समतोल कायम राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावणे हे आपले परमकर्तव्य आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचा एक भाग म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमात विध्यार्थी-शिक्षक,अंगणवाडी सेविका यांच्या सह समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,नेर्ल्याचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील उपस्थित होते.
इस्लामपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,अभिजित रासकर,अभिजित कुर्लेकर,तालुका उपाध्यक्ष माणिक पाटील,संदीप पाटील,अभिजित पाटील,सचिन पाटील,नितीन पाटील,विक्रम पाटील,सौरभ चव्हाण,महेश पाटील,विनायक यादव,सुहास पवार,किरण पाटील,विश्वास कदम,दिग्विजय माने,सुधीर शेटे,प्रमोद पाटील,संदीप पाटील,शुभम पाटील,रोहित देवकर,लखन पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमाचे आयोजन करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.