rajkiyalive

JAYANT PATIL : प्रतिक पाटलांच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणार

JAYANT PATIL : प्रतिक पाटलांच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणारनिवडणुका बघून मराठ्यांना आरक्षण नको, टिकणारे द्या : आ. जयंत पाटील

 

 

JAYANT PATIL : प्रतिक पाटलांच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणार

जनप्रवास । सांगली

मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन दारात आल्यानंतर सरकार जागे झाले आहे. राज्यभर डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यास विलंब लागणार आहे. सरकार चुकीच्या पध्दतीने प्रकरण हाताळत आहे. लोकसभा व विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजाचे नुकसान करू नये, टिकणारे आरक्षण द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तर मुलगा प्रतिक पाटील याच्या उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे, पण त्याचा निर्णय पक्षीय पातळीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आ. जयंत पाटील सांगलीत आले होते.

त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यासासाठी वेळ लागणार आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दारात उद्या येणार आहेत. त्यानंतर सरकार जागे झाले आहे. सरकारने कसे चुकीची हाताळणी केली हे दिसून येते. टिकणारे आरक्षण द्यावे लोकसभा व विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजावर अन्याय करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर वाळवा विधानभा अथवा हातकणंगले लोकसभेचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. प्रतिक पाटील यांची चर्चा सुरू आहे. लोकांची देखील तशी मागणी आहे. माझ्या लोकसभेबाबत चर्चा आहेत. पण पक्षाचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे इच्छा जरी असली तरी पक्षाच्या चौकडीत बसून निर्णय होत असतो.

 

लोकसभेच्या जागा वाटपासाठी दि. 25 रोजी महाविकास आघाडीतील पक्षांशी बैठक आहे.

काही जागांचा निर्णय झाला आहे. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याचा निर्णय आता हाईल. राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. आणखी काही मिळाल्या तर त्या बोनस असतील. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणायचे आहे. वंचित बहुजन आघाडीची तशी भूमीका देखील आहे. त्यामुळे ते सहभागी झाले तर स्वागतच असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजप रामराज्य निर्माण करणार असल्याचे सांगत आहेत.

पण याची संकल्पना, कल्पना मोठी आहे. त्याची तुलना करायला खूप वेळ लागले. अयोध्येला रामाचे मंदिर व्हावे, अशी सर्व देशवासिवांची भावना होती. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीचा हा वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचा निर्णय दिला. न्यासाने मंदिर उभे केले, राम हे सर्वांचे आहेत.

 

देशातील सर्व भाविकांनी उत्सव साजरा केला. मी देखील दर्शनाला जाणार आहे.

पण गर्दी कमी झाली की जाणार आहे. प्रार्थना करेन प्रभू रामचंद्र मला पावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय दृष्ट्या जाणीवपूर्वक नोटीस रोहित पवार यांना सुनावणीची नोटीस आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पात्र-अपात्रची सुनावणी बुधवारी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. न्यायिक व्यवस्थेच्या समोर जायचे असते त्यावर आधी भाषण करणे बरोबर नसते. प्रत्येक वेळी विचार वेगळा असतो. एकच निर्णय होत नसतो. त्यामुळे आम्ही म्हणणे मांडणार असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

महागाई, बेरोजगारी चर्चा नाही, इव्हेेंट राज्यकारभार सुरू: आ. जयंत पाटील

महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार, महिला बेपत्ता यावर सरकार चर्चा करत नाही. त्यावर ठोस उपाययोजना करत नाहीत. सध्या केवळ इव्हेंट राज्यकारभार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी महिला मेळाव्यात बोलताना केली. तर पक्षातील कोण गेले कोण राहिले हे बघण्यापेक्षा महिलांनी बूथ कमिट्या मजबूत करून सरकारविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन देखील आ. पाटील यांनी केला.

हेही वाचा
SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले…
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर व ग्रामीण भागातील महिलांचा मेळावा येथील राजपूत मंगल कार्यालयात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील बोलत होते. मेळाव्याला महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, आमदार अरूण लाड, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा कवित्रा म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, यशवंत गोसावी, बाबासाहेब मुळीक, संजय बजाज आदी उपस्थित होते. आ. जयंत पाटील म्हणाले, राज्यात व देशात सध्या भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर चर्चाच बंद झाली आहे. अंगणवाडी, आशा सेविकांचे प्रश्न आहेत. समाजाच्या शेवटच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. हे प्रश्न बाजुला पडले आहेत. याकडे दुर्लक्ष होत आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोलचे दर कमी करतो म्हणून सत्ता घेतली. पण आता गॅसचा दर 1200 रूपये तर पेट्रोल शंभरी पार केले आहे. सिमेंट, सळी महाग झाले आहे. यावर चर्चा होत नाही. केवळ इव्हेंट राज्यकारभार सुरू आहे. काही लोक फार वर्षांनी मंदिरात केले, त्याची चर्चा सुरू आहे.

सध्या देशात सुरू असलेला कारभारावर आता महिलांनी जनजागृती करणे आवश्यक आहे.

बूथ कमिट्या मजबूत करून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ही चर्चा पोहचवणे आवश्यक आहे. पक्षातून कोण दुसर्‍या पक्षात गेले, याकडे लक्ष देऊ नका. राजकारणात लोकांना अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे करावे लागते. पक्ष हा गाड्यांच्या जिवावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या जिवावर चालतो. त्यामुळे महिलांनी पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा, नव्यांना संधी द्यावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले. अ‍ॅड. रोहिणी खडसे म्हणाल्या, महिलांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक महिला सक्षम झाल्या. संपत्तीत देखील महिलांना पुरूषांबरोबर वाटा मिळाला. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले. पण आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने लोकसभेला 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा आरक्षणाचा जुमला आहे. महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षच खंबीरपणे उभा आहे.

काही लोक वाईट काळात पक्षाची साथ सोडून सत्तेत भ्रष्ट जुमला मित्रमंडळ सामील झाले आहेत. पण हेच लोक आता पुन्हा सत्ता आली की आपल्याकडे येतील. म्हणजे आपले संघटन मजबूत होते. सध्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. विकासाचे बोलत नाहीत. केवळ पक्ष फोडायचा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. महिलांनी आता बूथ कमिट्या सक्षम कराव्यात, प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जाऊन सरकारविरोधात जागृती करावी. राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली…

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद वाढत आहे. शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, वाळवा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. जतमध्ये देखील ताकद वाढत आहे. पूर्वी पलूस-कडेगाव जुना भिलवडी-वांगी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी होती. पण आता आमदार अरूण लाड व युवा नेते शरद लाड यांनी पक्षाची ताकद वाढवली आहे. पूर्वीची परिस्थिती बदलली असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज