JAYANT PATIL ISLAMPUR इस्लापुरात जयंत पाटील यांच्याहस्ते महाआरती..

SHARE:

JAYANT PATIL ISLAMPUR इस्लापुरात जयंत पाटील यांच्याहस्ते महाआरती..

JAYANT PATIL ISLAMPUR : इस्लापुरात जयंत पाटील यांच्याहस्ते महाआरती.. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या सह हजारो स्त्री-पुरुष,युवक भाविकांच्या साक्षीने,’जय श्रीराम’च्या निनादात.. अत्यंत भक्तिमय वातावरणात इस्लामपूर येथील लाल चौक-गांधी चौकात प्रभू रामचंद्रांची महा आरती करण्यात आली.

 

JAYANT PATIL ISLAMPUR : इस्लापुरात जयंत पाटील यांच्याहस्ते महाआरती..

युवक राष्ट्रवादी व खेळाडूंची भव्य मोटार सायकल मशाल रॅली,भारतीय तिरंग्याच्या तीन रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला,तसेच राम-लक्ष्मण- सीता-हनुमान आदी वेषभूषा केलेले जयंत बाल मोहनच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.प्रभू राम हा आपणा सर्वांचा आहे,या भावनेने आपण जात-धर्म,व पक्षाच्या पलीकडचा विचार करून अयोध्येतील श्रीराम मंदीरातील प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधून ही महा आरती करीत असल्याची भावना, आ. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी ’लकी ड्रॉ’च्या माध्यमातून 51 महिला भगिनींना चांदीचे नाणे भेट देण्यात आले.

सकाळपासूनच शहराच्या कानाकोपर्‍या तून हजारो महिला लाल व गांधी चौकात एकत्र आल्या.

येथे मोठ्या उत्साहात ’श्रीराम, जय राम,जयजय राम’चा जप करण्यात आला.दरम्यान युवक राष्ट्रवादीचे सचिन कोळी,स्वरूप मोरे,सागर जाधव,अभिजित कुर्लेकर,अभिजित पाटील,अभिजित रासकर, सूरज कचरे,राष्ट्रीय खेळाडू दर्शन पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते व खेळाडूंनी रामलिंग बेट व कारखाना श्रीराम मंदीरातून कोर्ट,आझाद चौक,गणेश भाजी मंडईतून लाल चौकात मोटार सायकल रॅली आणली. येथे आ.पाटील यांनी रॅलीचे स्वागत केले. आ.पाटील यांच्या हस्ते रामेश्वर मंदीरात प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात आली. त्या नंतर लाल चौकात उभारलेल्या छोट्याशा व्यापीठावर उभा राहून त्यांनी आरती केली. यावेळी लाल चौक व गांधी चौक भाविक भक्तांनी खचाखच भरून गेला होता. आरती संपल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

 

प्रमुख पदाधि कारी,कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,विश्वनाथ डांगे, अँड.धैर्यशिल पाटील,रोझा किणीकर,उषा पंडीत मोरे,रुपाली जाधव,वैशाली डांगे, सविता डांगे,आशाराणी पाटील,पुष्पलता खरात यांनी अतिशय उत्तम नियोजन केले. प्रा.शामराव पाटील,आनंदराव मलगुंडे,पै. भगवान पाटील,दादासाहेब पाटील,संदीप पाटील,सुभाषराव सुर्यवंशी,शंकरराव चव्हाण, प्रा.अरुणादेवी पाटील,सुस्मिता जाधव,कमल पाटील,प्राचार्य दीपा देशपांडे,जयश्री माळी, जयश्री पाटील,शुभांगी शेळके,सुनिता सपकाळ,शैलजा जाधव,योगिता माळी, मनिषा पेठकर,संगिता शहा,संजय पाटील (धनी) यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधि कारी,कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नारायण वाळवेकर,श्याम दंडगे,राम दंडगे,रविंद्र बेळगी,प्रमोद कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. राजारामबापू मिलिटरी स्कुल तसेच विद्या मंदीरच्या विद्यार्थी-खेळाडूंनी रॅली व संयोजनात भाग घेतला. सदानंद गाडगीळ (सांगली) यांनी प्रभावी सूत्र संचालन केले.

 

कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदीरातप्रतिकदादा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अलिका पाटील यांच्याहस्ते पूजा

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी ४२ वर्षांपूर्वी ‘श्रीराम मंदीरा’ची संकल्पना मांडून पायाभरणी केलेल्या आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर उभारणी केलेल्या,जिल्ह्यातील ‘भाविकांचे श्रध्दास्थान’ कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदीरात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अलिका पाटील यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींची पूजा व आरती करण्यात आली.  माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील यांनीही प्रभू रामचंद्रां च्या मूर्तींचे दर्शन घेतले. यावेळी रामलिंग बेटावरील श्रीराम मंदीरातून आणलेल्या  मशालचे स्वागत करण्यात आले.
राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रीराम मंदीरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची पूजा करताना प्रतिकदादा पाटील व सौ.अलिका पाटील. फोटो ओळी- इस्लामपूर येथील लाल चौक व गांधी चौकात प्रभू रामचंद्रांची आरती करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. समोर हजारो महिला,पुरुष व युवक भाविक.
 प्रारंभी प्रतिकदादा पाटील व सौ.अलिका पाटील यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. या सोहळ्याचे पौरोहित्य संतोष जोशी यांनी केले. अयोध्येतील श्रीराम मंदीरात मूर्तींची प्रतिष्ठाप ना केल्याचे औचित्य साधून ही पूजा व आरती करण्यात आली. या आरती सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक-भक्त सहभागी झाले होते.
 अँड.धैर्यशिल पाटील,संचालक सर्वश्री बाळासाहेब पवार,विठ्ठल पाटील,कार्तिक पाटील,रघुनाथ जाधव,दादासाहेब मोरे,प्रताप पाटील,रामराव पाटील,दिपक पाटील,शैलेश पाटील,अमरसिंह साळुंखे,रमेश हाके,हणमंत माळी,संचालिका मेघा पाटील,डॉ.योजना शिंदे-पाटील,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,सुनिल पोळ,डॉ.प्रकाश पाटील, आबासाहेब पाटील,साखराळे उपसरपंच बाबूराव पाटील यांच्यासह कारखान्याचे अधिकारी,कामगार,तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *