rajkiyalive

jayashri patil news : माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

 

jayashri patil news : माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश : काँग्रेस पक्षातून निलंबित केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर स्व. मदनभाऊ पाटील गटाचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच देखील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्र व मिरज तालुक्यात काँग्रेसला धक्का बसणार आहे.

jayashri patil news : माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

मनपा क्षेत्र व मिरज तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का

सांगली विधानसभेच्या निवडणुकीवेळी बंडखोरी केली म्हणून काँग्रेस पक्षाने जयश्रीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जयश्रीताई पाटील यांना दूरध्वनी करून भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी जयश्रीताई पाटील यांची भेट घेत भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे.

त्यांच्यासोबत मदनभाऊ गटातील अनेक महापालिका क्षेत्र व मिरज तालुक्यातील पदाधिकारी जाणार आहेत.
यामध्ये  कांचन कांबळे, किशोर शहा, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, रोहिणी पाटील, मृणाल पाटील यांच्यासह 15 ते 20 माजी नगरसेवक आहेत. तर ग्रामीण भागातील तानाजी पाटील (सलगरे), निवास पाटील (कवलापूर) यांच्यासह वसंतदादा गटातील अनेकजण प्रवेश करणार आहेत.

याबरोबर विष्णू अण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्यध्यक्ष शितल लोंढे, आंनदराव पाटील, सुभाष यादव, नरसगोंडा पाटील देखील प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

jayashri-patil-news-former-corporator-former-zilla-parishad-member-to-join-bjp

खासदारांच्या बालेकिल्ल्यातील तीन नगरसेवक भाजपमध्ये…

खासदार विशाल पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या वसंतदादा कारखाना परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधील तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातील माजी महापौर कांचन कांबळे बुधवारी प्रवेश करणार आहेत. तर इतर दोघांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. ते दहा दिवसात भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे खासदारांना मोठा धक्का असणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज