sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास केली अटक :

SHARE:

sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास केली अटक :: सांगली : शहरातील एका परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चांद शेख या तरुणाला शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. त्याच्यावर पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला तिच्या कुटूंबियाच्या स्वाधीन करण्यात आले.

sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास केली अटक :

पोक्सो अंतर्गत सांगली शहर पोलिसांची कारवाई.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला 24 मे रोजी फुस लावून पळवून नेण्यात आले होते. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती.

तिची आई बाहेरगावी होती. ती रात्री परत आली असता घरातील साहित्य अस्तव्यस्त होते. घरात मुलगी नव्हती. शेजारी व इतर नातेवाईकांकडेही तिने विचारपूस केली. पण ती मिळून आली नाही. तिचा मोबाईल नंबरही बंद होता. अखेर 25 मे रोजी नातेवाईकांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीत चांद शेख याने मुलीचे अपहरण केल्याचे म्हटले होते. शहर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला.

sangli-crime-news-youth-arrested-for-kidnapping-minor-girl

हुबळी, बेंगलोर या शहरातही शोध घेतला. अखेर अल्पवयीन मुलगी विजयपूर (कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने विजयपूर गाठून मुलीला व चांद शेख या दोघांना ताब्यात घेतले. शेख याच्यावर पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपअधिक्षक प्रनिल गिल्डा म्हणाले की, शहर पोलिसांत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. प्रभारी अधिकारी संजय मोरे यांनी पथके रवाना केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सागर घोडे करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *