rajkiyalive

jayashri patil news : *सांगली ग्रामीण भागात जयश्रीताईंना उस्फुर्त प्रतिसाद*  दादा, अण्णा, बापू ,भाऊ यांचे सर्व कार्यकर्ते सक्रिय

jayashri patil news : *सांगली ग्रामीण भागात जयश्रीताईंना उस्फुर्त प्रतिसाद*  दादा, अण्णा, बापू ,भाऊ यांचे सर्व कार्यकर्ते सक्रिय: सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जयश्रीताई मदन भाऊ पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असून त्यांचे निवडणूक चिन्ह हिरा हे आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर सांगली विधानसभे करता दादा घराण्यातील व्यक्ती उभी आहे .त्यामुळे वसंत दादा पाटील, विष्णू अण्णा पाटील ,प्रकाश बापू पाटील, आणि मदन भाऊ पाटील यांचे सारे जुने ,नवे कार्यकर्ते सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सगळे जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते या  वडणुकीसाठी जयश्रीताई पाटील यांच्याकरता सक्रिय झाले असून ग्रामीण भागातून त्यांच्या उमेदवारीला महिला, पुरुष ,वृद्ध यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .

jayashri patil news : *सांगली ग्रामीण भागात जयश्रीताईंना उस्फुर्त प्रतिसाद*  दादा, अण्णा, बापू ,भाऊ यांचे सर्व कार्यकर्ते सक्रिय

 स्वर्गीय मदन पाटील यांच्या निधनानंतर गेली नऊ वर्ष बाजार समिती ,विष्णू अण्णा खरेदी-विक्री संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, शिक्षण मंडळ या सर्वावर जयश्रीताई पाटील यांनी निस्वार्थपणे कार्यकर्त्यांना संधी दिली. सांगली शहरातील प्रत्येक वार्डात आपले कार्यकर्ते आपला गट कोणतीही पदाची शक्ती मागे नसताना जपण्याचा प्रयत्न केला .तर ग्रामीण भागात सर्वच्या सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले.
काहीजण लाटेवर स्वार होत बाजूला गेले होते. पण जयश्री वहिनींनी त्यांना कोणतीही त्रास अडवणूक किंवा इतर काही दबावाच्या गोष्टी केल्या नाहीत .अनेकांच्यावर अनेक उपकार ,पदे देऊन आर्थिक ,सामाजिक ताकद देऊन वसंतदादा घराण्याने केली आहे. पण सत्ता नाही म्हणून आणि सोडून गेले म्हणून कोणालाही कोणताही त्रास दिला नाही. या त्यांच्या चांगोलपणाच्या निस्वार्थ भावनेमुळे त्यांच्यावर निष्ठा असणारी आणि बाजूला गेलेली ही पुन्हा मंडळी एकसंघ होऊन ग्रामीण भागातील मातब्बर नेते ,कार्यकर्ते, बरोबरच सर्वसामान्य जनता ही जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा देत आहे. महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे .
  मतदार संघातील बुधगाव, माधवनगर ,नांद्रे, हरिपूर ,कर्नाळ यासारख्या मोठ्या गावात त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहेच. पण पदमाळे ,धामणी, बामणी ,अंकली या ग्रामीण भागातही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .प्रचार फेरी दरम्यान जयश्री वहिनींची भेट घेऊन लोक उस्फूर्त साथ देण्याचे आश्वासन त्यांना देत आहेत. आणि याच बळावर नव्या कार्यकत्यांचा ग्रुप वाढला आहे . नवे जुने झाडून सारे कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागले आहेत. तरुणाई मध्ये संग्राम दादा पाटील यांच्यासह अनेक जुने जाणते कार्यकर्ते सोबत असल्याने जयश्री पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज