rajkiyalive

jaysingpur crime news : जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी निलंबित

जयसिंगपूर/प्रतिनिधी-
jaysingpur crime news : जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी निलंबित: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी ही कारवाई केली. विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील अशी त्यांची नावे आहेत.

jaysingpur crime news : जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी निलंबित

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख पंडीत यांनी दिल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलंबित कार्यकाळात त्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक याठिकाणी हजेरी देण्यात यावी. तसेच पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याच्या कारणावरुन जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील राजकीय व्यक्तीबरोबरच, व्यापारी, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यापुर्वी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे केली होती.

या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली काय? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. याबाबत दैनिक जनप्रवासने सर्वप्रथम वृत्त देवून या विषयाला वाचा फोडली होती. यानंतर या पोलीस कर्मचार्यांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे यांनी जयसिंगपूरच्या पोलीस निरीक्षकांना दिले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज