rajkiyalive

jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून

jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून : तमदलगे (ता. शिरोळ) येथील बसवाण खिंडीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या गोळीबार मैदानजवळच्या रस्त्यावर अज्ञाताने निमशिरगाव येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून केला आहे. अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय 35 रा. निमशिरगाव) असे त्याचे नाव आहे.

jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून

याबाबत पोलिसातून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी. मूळचा निमशिरगाव येथील असलेला अविनाश पाटील याचा काल रात्रीच्या सुमारास अज्ञाताने अज्ञात शस्त्राच्या सहाय्याने तसेच दगडाने ठेचून बसवान खिंडीत असलेल्या गोळीबार मैदानाजवळ डोंगरात जाण्याच्या रस्त्याकडेला खून केल्याची घटना घडली.

तमदलगे हद्दीतील गट क्रमांक 28 येथे त्याचा सकाळी मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत आहे. तसेच मृतदेहापासून काही अंतरावर एक मोटरसायकल पडल्याचे पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. खून कोणत्या कारणातून झाला हे मात्र अजून गुलदस्त्यात असले तरी पोलीस कसोशीने प्रयत्न करून संशयीतांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

jaysingpur-murdar-news-nimshirgaon-youth-killed-in-tamdalge-pass

याबाबत तमदलगेचे पोलीस पाटील अमोल कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिले आहे. तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज