rajkiyalive

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध

84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505 उमेदवारांचे अर्ज, बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत 
जनप्रवास, सांगली
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायती व 26 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 29 सदस्य व तीन सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी या ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उर्वरित 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम आणि दंड या भेदाचाही काही ठिकाणी वापर करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक पहायला मिळाली. बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्य पदांच्या जागांसाठी तब्बल 3 हजार 509 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदाच्या 97 जागा आहेत. सरपंच पदाच्या जागेसाठी 519 उमेदवार  सदस्यांसाठी 2990 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते अर्ज माघारीनंतर 11 गावच्या कारभार्‍यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 84 सरपंच पदासाठी 218 सदस्यांसाठी1505 उमेदवार रिंगणात आहेत.
शिराळा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीपैकी मादळगाव, करुंगली, धसवाडी, कदमवाडी, बेलेवाडी या पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यातील कदमवाडी सरपंच पदाची जागा रिक्त राहिली आहे. चिंचेवाडी येथील सरपंच बिनविरोध तर चिखलवाडी येथे सरपंच व एक सदस्यसाठी निवडणूक होणार आहे. इंगरुळ,, खूजगाव याठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.
आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका असून त्यापैकी मुढेवाडी, आवटेवाडी, पुजारवाडी (आ) ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. १४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची रणधुमाळी रंगली आहे. करगणी, बनपुरीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. कडेगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीपैकी वाजेगाव ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली कवठेमहांकाळ तालुक्यातील २० ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या असून १८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
 बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती
शिराळा तालुक्यातील मादळगाव, करुंगली, धसवाडी, कदमवाडी, बेलेवाडी, आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी, आवटेवाडी, पुजारवाडी (आ), कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी, पिंपळवाडी, कडेगाव तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज