rajkiyalive

जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज

सरपंच पदासाठी 519 तर सदस्यांसाठी 2 हजार 990 अर्ज दाखल, सोमवारी छाननी

जनप्रवास : सांगली :

 जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड उडाली. 97 गावच्या सरपंच पदासाठी 519 जणांनी तर 94 गावच्या सदस्य पदासाठी 2 हजार 990 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कवठेमहांकाळ तालुक्यातुन सर्वाधिक सरपंचासाठी 124 तर 596 अर्ज आले आहेत. उमेदवारी अर्जांची सोमवारी (दि. 23) छाननी होईल. त्यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी 25 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान शिराळ्यासह कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील बहुतांशी गावांत चुरशीने निवडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरंपच आणि 822 सदस्यपदांच्या; तर तीन सरपंचपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली होती. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करतना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शुक्रवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते, त्यामुळे एकूण अर्जाबाबतची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु राहिली.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 219 व सदस्यांसाठी 1 हजार 316 उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक विभागाकडे पाच दिवसांच्या कालावधीत सरपंच पदासाठी 519 जणांचे आणि सदस्यांसाठी 2 हजार 990 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातुन सर्वाधिक सरपंचासाठी 124 तर 596 अर्ज आले आहेत. शिराळा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतसाठी सरपंच 118 तर सदस्यांसाठी 602 उमेदवारी अर्ज दाखल झाले. याशिवाय आटपाडीत सरपंच 118 आणि सदस्यांसाठी 581, पलूस तालुक्यात सरपंचासाठी 30 आणि सदस्यांसाठी 318 अर्ज आले आहेत.

हेही वाचा

ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203
जिल्ह्यातील नेत्यांच्या गावामध्येच रंगणार धुमशान

कुंडल, हरीपूर, नांद्रे, ढालगांव, साळशिंगे, बिळूर, आमणापूर, तांबवे, शिरटे, कारंदवाडी, बांबवडे, वाकुर्डे बुद्रुक, नेलकरंजी, वाक्षेवाडी, मिटकी, करगणी, निंबवडे या महत्वाच्या ग्रामपंचायतींसाठी चुरशीने निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छानणी सोमवारी होणार आहे. कुणाचा अर्ज छानणीत बाद होणार याबाबतची उत्सुकताही गावागावात लागली आहे.

अर्ज दाखल
तालुका सरपंच सदस्य
मिरज 10 42
अप्पर सांगली 19 204
तासगाव 9 62
क.महांकाळ 124 596
जत 24 168
आटपाडी 118 581
खानापूर 17 108
कडेगाव 25 161
पलूस 30 318
वाळवा 15 54
अप्पर आष्टा 10 64
शिराळा 118 602
एकूण 519 2990

 

अर्जांची आज छाननी

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 3 हजार 500 अर्जांची छाननी सोमवार दि. 23 रोजी होणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची मुदत दि. 25 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच आणि 822 सदस्यपदांच्या, तर तीन सरपंचपदांच्या पोटनिवडणुकीसाठी दि. 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शनिवारपर्यंत मुदत होती. या मुदतीत 97 गावांच्या सरपंचपदासाठी 519 जणांनी तर 94 गावांच्या सदस्यपदासाठी 2 हजार 990 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी सुमारे तीन हजार पाचशे अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवार दि. 23 रोजी होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज