rajkiyalive

kagal vidhansabha election 2024 : कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा, महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर,

कोल्हापूर :

kagal vidhansabha election 2024 : कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा, महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, : राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असे आवाहन त्यांनी कागलच्या जनतेला केले आहे.

kagal vidhansabha election 2024 : कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा, महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर,

अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली.
महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा विश्वास हसन मुश्रीफांना होता. त्यामुळे ’यंदाही सिक्स मारणार फिक्स’ असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे.

हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणार्‍या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.

हसन मुश्रीफ हे पवार कुटुंबीयांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जायचे. शरद पवारांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी होती. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे असलेला ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.

भाजपचे समरजीत घाटगे काय करणार?

अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यापासून कागलमधील भाजपचे नेते समरजीत घाटगे अस्वस्थ होते. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढूनही समरजीत घाटगेंनी जवळपास 90 हजार मतदान घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली. कागलची जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला यावरून सातत्याने चर्चा सुरू होत्या. विद्यमान आमदार असल्याने हसन मुश्रीफ यांनाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाही समरजीत घाटगेंनी आपली तयारी कायम ठेवली. त्यांच्यामागे देवेंद्र फडणवीसांची ताकद आहे. पण आता अजित पवारांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजीत घाटगे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज