karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्था इतर संस्थांसाठी आदर् ; डॉ. उदयराव जोशी यांचे गौरवोद्गार ” सांगली ः जिल्हयातील मोठी पतसंस्था या नात्याने कर्मवीर पतसंस्थेने इतर संस्थाना मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदयराव जोशी यांनी काढले. जिल्हा पतसंस्था फेडरेशन व सांगली जिल्हा नागरी बँक असोशिएशन, सहकार भारती आणि कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेच्यावतीने जिल्ह्यातील पतसंस्थांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीरात डॉ. जोशी बोलत होते.
karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्था इतर संस्थांसाठी आदर् ; डॉ. उदयराव जोशी यांचे गौरवोद्गार
डॉ. जोशी यांची सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थांच्यावतीने कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. बुलढाणा अर्बन सोसायटीचे सीईओ शिरीप देशपांडे यांची सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला.
डॉ. जोशी म्हणाले, केंद्रामध्ये सहकार मंत्रालय सुरु झाल्यामुळे सहकारासमोरील आडचणी समजुन घेण्यात येत आहेत. आर्थिक संस्थाना विनाकारण त्रास होणार नाही, सक्तीचे मर्जिंग होणार नाही आणि नविन संस्थांचा विस्तार करणे यावर सरकारचा भर असून सहकारातून विकासात्मक काम करण्यावर भर राहिल.
सहकारामध्ये काम करण्यास खुप वाव असल्यामुळे झोकून देण्यार्या कार्यकर्त्यांना येथे चांगली संधी असल्याचे ते म्हणाले. कर्मवीर पतसंस्थेने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारुन पतसंस्थाना प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाची भुमिका घेतली आहे. जिल्हयातील मोठी पतसंस्था या नात्याने कर्मवीर पतसंस्थेने सहकार संवर्धनाचे काम करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पहिल्या सत्रामध्ये पतसंस्थाना इनकम टॅक्स कायद्याबाबत कर सल्लागार अमित शिंत्रे यांचे व दुसर्या सत्रात स्टॅटेजिक मॅनेजमेंट या विषयावर डॉ. राजन पडवळ यांचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, सांगली जिल्हा बँक असोशिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए. डी. पाटील, डॉ. सिध्दनाथ महाडीक, प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले, शशिकांत राजोबा, वर्षाताई आवाडे, सांगली ग्रामीणचे अध्यक्ष सुमंत महाजन, शैलेश पवार, डॉ. अशोक सकळे, डॉ. नरेंद्र खाडे यांची उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



