rajkiyalive

karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

सांगली / प्रतिनिधी 

karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार 2024 देवून गौरविण्यात आले. पुणे विभागातून एक हजार कोटीवरील ठेव गटातून हा पुरस्कार मिळाला.

karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

हैद्राबाद येथे झालेल्या सोहळ्यात कॉसमॉस को ऑप. बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहकसेवा, व्यवस्थापन, सहकारातील योगदान या मापदंडावर आधारीत या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली. संस्थेने महाराष्ट्रातील सहकार चळवळीत आदर्श काम केल्याचेही पुरस्कार वितरण सोहळयात नमुद करण्यात आल्याचे ते म्हणाले.
संस्थेच्या ठेवी ११२० कोटी रुपये असून ८२३ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल ३७ कोटी रुपये असून सभासद संख्या ६५२०० आहे. मार्च २०२४ अखेर संस्थेस २६ कोटी १ लाखाचा नफा झाला आहे. पुरस्काराचे श्रेय संस्थेच्या संचालक मंडळाने केलेले नियोजन, सभासद, ठेवीदार, कर्जदार, सेवक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांची उत्तम साथ याला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, डॉ. एस.बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, लालासाहेब थोटे आदी उपस्थित होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज