kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेचा घेतला बेकायदेशीर ताबा : तिघांवर गुन्हा दाखल. : सांगली : शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. सदरची घटना हि दि. 08 मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेचा घेतला बेकायदेशीर ताबा : तिघांवर गुन्हा दाखल.
या प्रकरणी मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीचे लीगल मॅनेजर गौरव प्रकाश जवळकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शैलेश मनोहर पांढरे, कमलेश मनोहर पांढरे आणि राधाबाई मनोहर पांढरे (सर्व रा. कसबेडिग्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी ऍड. गौरव जवळकर हे शहरातील मोतीलाल ओसवाल फायनान्स लिमिटेड या कंपनीत लीगल मॅनेजर पदावर काम करतात. ओसवाल कंपनीचे कर्जदार संशयित पांढरे यांनी कंपनीच्या कर्जाचे हप्ते भरले नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तारण असलेल्या मालमत्तेचा ताबा घेऊन सदरची मालमत्ता सील केली होती.
kasbe-digraj-crime-news-illegal-possession-of-confiscated-property-in-kasbe-digraj-case-registered-against-three
यावेळी संशयितांनी सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून नुकसान करत बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे जवळकर यांच्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.