kasbe digraj news : कसबे डिग्रजच्या पूजेस भालचंद्र पाटील यांची भेट: सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने सुरू असलेल्या विधान महोमहोत्सवात शुक्रवारी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी भेट दिली. यावेळी कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
kasbe digraj news : कसबे डिग्रजच्या पूजेस भालचंद्र पाटील यांची भेट
28 एप्रिलपासून कसबे डिग्रज येथे विधान सुरू आहे. जिल्हयातील आणि इतर जिल्ह्यातूनही भाविक दररोज येत आहेत. मान्यवरांची भेटीगाठीही सुरू आहेत. शुक्रवारी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे शशिकांत राजोबा, राहूल चौगुले हेही उपस्थित होते. यावेळी कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यजमान उद्योजक प्रशांत अवधुत, सुकुमार चौगुले, विशाल चौगुले यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
विधानकालावधीमध्ये दररोज सकाळच्या सत्रात हत्तीवरून जलकुंभ आणणे, यजमानांची मिरवणूक आदी कार्यक्रम होत आहेत.
दुपारच्या सत्रात विद्यासागर महाराजांचे मंगल प्रवचन, रात्री मंगल आरती असा भरगच्च कार्यक्रम सुरू आहे. गावामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानी, डिजिटल, पंचरंगी झेंड यामुळे गाव सजले आहे. येथील बागणवाटेवर भव्य आणि दिव्य असे मंडप उभारण्यात आले आहे. युवा उद्योजक पिंकू उर्फ प्रशांत अवधूत या दांप्मत्यांना इंद्र इंद्रायणीचा मान मिळाला आहे.
कसबे डिग्रज येथे बर्याच वर्षानंतर विधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिल ते 4 मे 2025 अखेर ही पूजा होणार आहे. आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य आगमचक्रवती विद्यासागरज महाराज, आगमसागरजी महाराज, प्रशांतसागरजी महाराज आदींचे आशीर्वाद यापुजेला लाभले आहे.
kasbe-digraj-news-bhalchandra-patils-visit-to-the-worship-of-kasbe-digraj
धनपती कुबेर महेश जंबू चौगुले, चक्रवर्ती राकेश रमेश फराटे, महायज्ञनायक प्रकाश आदीनाथ फराटे, ईशान्य इंद्र राजेेंद्र बापू दुधगावे, सुवर्ण सौभाग्यवती प्रियांका प्रकाश चौगुले, ध्वजारोहण सुरेश अनंत चौगुले, मंडप उद्घाटक तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी, अखंड दीपस्थापना आण्णासो कुबेर चौगुले, मंगल कलश स्थापना आण्णासो कुबेर चौगुले, प्रथम दिन जलकंभ आणणे बाहुबली महावीर अवधूत, भरत आळतेकर, श्रेणीक पाटील, आदींनी सवाल धरले आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.