kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये अजय चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील संस्कार फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय अजयसिंह दादा चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त संस्कार फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये अजय चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
यावेळी हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक, सांगली व एम. एस. आय. ब्लड सेंटर मिरज या दोन रक्तपेढीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले, एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
शिबिराच्या उद्घाटनावेळी गावातील आजी माजी सरपंच, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन व सर्व संचालक व गावातील मान्यवर उपस्थित होते. संस्कार फाउंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथ हराळे, उपाध्यक्ष किशोर भंडारे, सदस्य संजय चव्हाण, संतोष कापसे, गणेश चव्हाण, शकील कोठावळे, किरण जगताप, दिनकर शिंदे, विजय पिंपळे, विशाल उदगिरे, धनंजय फराटे, किरण पाटील, राजेंद्र नलवडे, सिद्धनाथ लवटे, विजय पिंपळे, उदय चव्हाण, वीरू चव्हाण व मित्रमंडळी मान्यवर उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



