dineshkumar aitawade 9850652056
kavte piran news : मरणालाही समाधान वाटावे असे ठिकाण — कवठेपिरांची स्मशानभूमी : माणूस जन्माला येतो, मोठा होतो, सुख-दुःखाची वळणं घेत जगतो… आणि शेवटी एक दिवस या पृथ्वीवरची त्याची पायरी थांबते. मृत्यू हा जगातला सर्वांत निष्ठूर खरा आहे, पण त्याच वेळी तो जीवनाला पूर्णत्व देणारा अंतिम सोहळा देखील आहे. माणसाचा जन्म कधी, कुठे होईल हे कधीकधी सांगता येतं; परंतु मृत्यू कसा, केव्हा आणि कुठल्या मातीच्या कुशीत आपल्याला बिलगेल, याचं भाकित कोणीच करू शकत नाही.
kavte piran news : मरणालाही समाधान वाटावे असे ठिकाण — कवठेपिरांची स्मशानभूमी
पण… मृत्यूनंतर आपल्याला एकच आशा असते — “शेवटचा प्रवास तरी शांततेत, सन्मानाने व्हावा.” म्हणूनच कवठेपिरांच्या ग्रामपंचायतीने उभारलेली स्मशानभूमी ही केवळ चिता पेटवण्याची जागा नाही, ती जणू एखाद्या साधूच्या समाधीप्रमाणे शांत, निसर्गमय, सुंदर अशी एक पवित्र जागा आहे.
तिथे पाऊल ठेवताच अंगावर काटा उभा राहतो आणि हृदयात विलक्षण शांती उतरते. जणू मृत्यू स्वतः सांगतो — “घाबरू नको, इथे सर्वांना सामावून घेणारी माती आणि ममतेने कवेत घेणारी हवा आहे.”
स्मशानभूमीत प्रवेश करताच गर्द झाडांची हिरवी चादर अंगावर पसरते. वाऱ्यावर हलणारी पाने जणू मृतांना शांतीच्या गाण्याच्या लहरीत गुंफत असतात. सरणाजवळ मांडलेले सुविचार, जीवनाचं सार सांगणाऱ्या कविता मृत्यूच्या सत्याला समजून घेण्याची शिकवण देतात. प्रत्येक शब्द मनाला हलवून जातो — “जीवन क्षणभंगुर आहे, वाया घालवू नकोस,” असं सांगत माणसाच्या अहंकाराला झुकायला भाग पाडतो.
हेही आवर्जुन वाचा
तीनशे वर्षांची परंपरा लाभलेला – समडोळीचा जोगणी महोत्सव
शंभर वर्षांची साक्ष देणारी, समडोळीतील शालिनी पाटलांची विहीर
समडोळीच्या हृदयात वसलेला शिक्षणाचा राजवाडा
समडोळीच्या वग्यानी वाड्याचा राजेशाही पुन्हा जागृत…
समडोळीचा दीडशे वर्षांपूर्वीचा गंजीखाना – वैरणीतून गावसंस्कृतीची पाळंमुळे
स्मशानात उभं राहून चारी बाजूंना नजर फिरवली, की दिसतात सुंदर बाकडी, पाण्याची व्यवस्था, मोकळी जागा… जणू मृतांच्या शेवटच्या पाहुणचाराला कोणी कसर सोडलेली नाही. माणसाच्या देहाचे अंतिम संस्कार करण्यासाठी असं आदरपूर्ण, स्वच्छ, निसर्गरम्य स्थान पाहून अंतर्मनात नकळत एक भावना दाटून येते — “मरण यावं तरी इथेच यावं…”
मृत्यूच्या नावानंही माणसं घाबरतात, पण कवठेपिरांची स्मशानभूमी पाहिली की मृत्यूकडेही कृतज्ञतेनं पाहावं वाटतं. कारण तिथलं निसर्गाचं भव्य रूप आणि माणसांनी घालून दिलेलं सुसंस्कृत रूपण मृत्यूच्या वेदनांनाही शांतीत परिवर्तीत करतं.
खरंच, प्रत्येक गावात अशीच एक स्मशानभूमी असावी. मृत्यूलाही मानवतेचा स्पर्श लाभावा. देह जाळताना नुसती राख उरणार नाही, तर त्या राखेतूनही माणुसकीच्या सुगंधाचा धूर उठावा.
kavte-piran-news-a-place-where-even-death-can-feel-content-kavathepiranchi-cemetery
कवठेपिरांच्या ग्रामपंचायतीला आणि त्या मातीला वंदन करावं इतकं हे ठिकाण सुंदर आहे — जिथे मरणालाही समाधान वाटावं, अशी जागा…
**– जीवनाचं अंतिम सत्य ओळखूनही, मृत्यूच्या कुशीत जाऊनही माणूस हसावा, एवढं काही तरी या मातीने आणि माणसांनी इथे उभं केलं आहे…!

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.