kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव : सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे आई-वडिलांना सतत शिवीगाळ करत असल्याच्या रागातून चुलत्याचा डोक्यात चिनी मातीची बरणी मारून खून करत अपघाताचा बनाव करणार्या पुतण्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. खून करणार्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरची घटना हि गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी घडली होती. मिरासो बाबासो तांबोळी (वय 62) असे खून झालेल्या वृद्धांचे नाव आहे. खून करणार्या सुभान उस्मानगनी तांबोळी (वय 23 रा. कवठेएकंद) याला अटक केली आहे.
kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत मिरासो तांबोळी हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील कवठेएकंद गावामध्ये राहत होते. मिरासो तांबोळी हे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोक्यास मार लागल्याने त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांना मिरासो यांच्या मृत्याबाबत शंका आल्याने वरिष्ठ अधिकार्यांना याची कल्पना दिली. या प्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना कर्मचार्यांना माहिती मिळाली कि, मयत मिरासो यांचा पायरीवरून पडून मृत्यू झाला नसून त्यांचा पुतण्या सुभान तांबोळी याने डोक्यात मारून खून केला आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित सुभान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली. यावेळी सुभान याने त्यांचे चुलते मयत मिरासो हे सतत सुभान आणि त्याच्या आई वडिलांना कौटुंबिक कारणातून सतत शिवीगाळ करत होते. गुरुवारी देखील शिवीगाळ करत असताना राग आल्याने त्यांना मारहाण करून चिनी मातीची बरणी डोक्यात घालून खून केल्याचे सांगितले. यावेळी त्याला अटक करून पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
kavthe-eakand-murdar-kavathe-ekand-rethe-murdered-his-cousin-by-putting-a-jar-on-his-head-making-it-an-accident
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सागर टिंगरे, दर्याप्पा बंडगर, सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, संदीप गुरव, अमर नरळे,. मछिंद्र बर्डे, महादेव नागणे विक्रम खोत, उदय माळी आणि संदीप नलावडे यांच्या पथकाने केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.