ken agro news : केन अॅग्रोकडून सात वर्षात होणार 225 कोटी वसूल : रायगाव येथील केन अॅग्रो एनर्जी या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे 160 कोटी रुपयांची थकित होते. थकबाकी वसुलीसाठी बॅँक व कारखान्याच्या सहमती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला 225 कोटींचा वसुली आराखडा न्यायमूर्ती रिता कोहली व न्यायमूर्ती मधू सिन्हा यांनी मंजूर केला आहे. पुढील सात वर्षात हप्त्या हप्त्याने ही रक्कम कारखान्याकडून वसुल होणार आहे.
ken agro news : केन अॅग्रोकडून सात वर्षात होणार 225 कोटी वसूल
एनसीएलटीकडून वसुलीचा आराखडा मंजूर, जिल्हा बँकेला दिलासा
केन अॅग्रो कंपनीच्या साखर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने 160 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी बॅँकेने सरफेसी अॅक्ट अंतर्गत कारखान्याच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला होता. त्यानंतर कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) या कारखान्यावर रिझोल्यूशन प्रोफेशनल (व्यावसायीक) नियुक्त केला. त्यांच्यासमोर सुनावणीवेळी बँकेने आपला दावा दाखल केला. कारखान्याने एनसीएलटीमार्फत जिल्हा बॅँकेला 225 कोटी 68 लाख 86 हजार रुपयांचा वसुली आराखडा (रिझोल्यूशन प्लॅन) सादर केला. यावर जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात चर्चा झाली.
यावेळी केन अॅग्रोचा 160 कोटी रुपये मुद्दल व व्याज असा 225 कोटी 68 लाख 86 हजार रुपयांचा रिझोल्यशून प्लॅन अटींसह मंजूर करण्यात आला. तसेच मुद्दलाची रक्कम 160 कोटींवर 6 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासह उर्वरित व्याज वसूल होणार आहे. ही रक्कम परतफेड करण्यासाठी पुढील सात वर्षे हप्ते पाडून देण्यात येणार आहेत. हा रिझोल्यूशन आराखडा एनसीएलटीपुढे सादर करण्यात आला होता. मात्र गेली जवळपास दोन वर्ष यावर सुनावणी सुरु होती. 3 जानेवारी 2025 रोजी याप्रकरणी झालेल्या सुनावणीत एससीएलटीने युक्तीवाद संपवत हे प्रकरण निकालावर ठेवले.
या आराखड्याविरोधात दाखल केलेल्या काही याचिका पूर्वी एनसीएलटीने फेटाळून लावल्या आहेत.
त्यामुळे सदरचा रिझोल्यूशन प्लॅन एकप्रकारे मंजूर झाला होता, मात्र अंतिम निकाल झालेला नव्हता. सोमवारी न्यायमूर्ती रिता कोहली व न्यायमूर्ती मधू सिन्हा यांनी निकालपत्रावर सही करत या वसुली आराखड्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जिल्हा बॅँकेचे या कारखान्याकडे अडकलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ken-agro-news-ken-agro-to-recover-rs-225-crore-in-seven-years
सात वर्षात कर्जाचे व्याजासह मुद्दलाची वसुली
केन अॅग्रो कंपनीच्या साखर कारखान्याकडील 225 कोटी 68 लाख, 86 हजार रुपये वसुलीबाबत एनसीएलटीकडे दाखल केलेल्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झाला आहे. न्यायमुर्तींनी निकालपत्रावर सही केली आहे. दोन दिवसांत न्यायालाचा आदेश बॅँकेला प्राप्त होईल. या कारखान्याकडे कर्जाचे 160 कोटी रुपये मुद्दल आहे. व्याजासह सात वर्षात 225 कोटी रुपये वसुल होणार आहेत. यामध्ये बॅँकेचा काहीही तोटा होणार नसल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
अशी होणार कर्ज वसुली
एनसीएलटीचा आदेश मिळाताच केन अॅग्रोने जिल्हा बॅँकेस तातडीने 18 कोटी रुपये भरायचे आहे. त्यानंतर सात वर्षात हप्त्या हप्त्यांनी या कर्जाची परत फेड करायची आहे. हे हप्तेही एनसीएलटीने ठरवून दिले आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षी 50 कोटी, दुसर्या वर्षी 29, तिसर्या वर्षी 27 कोटी, चौथ्या वर्षी 26 कोटी, पाचव्या वर्षी 25 व सहाव्या वर्षी 24 तर सातव्या वर्षी 23 कोटी रुपयांचा हप्ता भरायचा आहे. हे हप्ते व्याजासह आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



