rajkiyalive

khanapur -atpadi vidhansabha election 2024 : वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीने मतदारसंघात उडाली खळबळ

प्रताप मेटकरी / जनप्रवास विटा
khanapur -atpadi vidhansabha election 2024 : वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीने मतदारसंघात उडाली खळबळ : गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. आज आटपाडीचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि वैभव पाटील हे दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. दरम्यान वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने निवडणूकीचे रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

khanapur -atpadi vidhansabha election 2024 : वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीने मतदारसंघात उडाली खळबळ

आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय पैर्‍याची नांदी ?

वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटकपक्ष आहे. खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्याने वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभा राहणार ? याकडेच मतदारसंघाच्या सर्वांच्या नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते मैदान मारणारच असा चंग बांधून तयारी करत आहेत. सध्या ते पक्ष बदलणार ? अशीही चर्चा होत असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून व शरद पवार गटाच्या तुतारीकडेही वळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू अद्यापही त्यावर त्यांनी भाष्य केलेले नाही.

तसेच गेल्या आठवड्यात माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आटपाडीतील देशमुखांच्या वाड्यावर जात राजकीय पैर्‍याची साद घातल्याची चर्चा आहे.

दरम्यान आज वैभव पाटील आणि अमरसिंह देशमुख हे दोघेही मतदारसंघाचा राजकीय केंद्रबिंदू असणार्‍या मांजर्डे येथील एका कार्यक्रमात एकत्र आल्याने आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आणि चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. अमरसिंह देशमुख हे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे बंधू आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत.

आटपाडी तालुक्यातून कोण कुठल्या उमेदवाराला साथ देणार ? यावर निवडणूकीची गणिते ठरलेली असतात.

त्यामुळे या दोघांच्यात झालेली ही चर्चा पुढील राजकारणाची नांदी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या दोघांमधील या भेटीने मात्र मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा पाटील देशमुख गटात आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पैरा होणार का ? याचीच उत्सुकता मतदारसंघात निर्माण झाली आहे.

बाबर कुटुंबीय आणि देशमुख यांचे राजकीय वैर जगजाहीर असल्याने ते येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येण्याची चिन्हे दाट आहेत.

जरी महायुती म्हणून देशमुख यांना शिवसेनेचे काम करावे लागले तरी अंतर्गतरित्या लोकसभा फॉर्म्युला राबवून नेते एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे असा करेक्ट कार्यक्रम राबवून बाबर गटाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील याचा फायदा उचलण्यासाठी पाटलांच्या देशमुखवाड्यावरती उठबस वाढली आहे. असे बोलले जाते.

तसेच विसापूरसर्कल एकहाती काबीज करण्यासाठी वैभव पाटील काम करताना दिसून येत आहे.यासाठी संजयकाका पाटील याचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी सतत विसापूर सर्कलमध्ये दौरे वाढवले आहेत. दरम्यान वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या आजच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत पाटील समर्थकांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रान तापविण्यास सुरुवात केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज