rajkiyalive

खानापूर मतदारसंघातील युवा नेतृत्वाची भूमिका ठरणार निर्णायक

विटा / प्रताप मेटकरी
खानापूर मतदारसंघातील युवा नेतृत्वाची भूमिका ठरणार निर्णायक : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेची निवडणूकीची रंगीत तालीम होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या लोकसभा निवडणूकीच्या निि माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख या युवा नेतृत्वाची मताधिक्य देताना कसोटी पणाला लागणार असून त्यांची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

खानापूर मतदारसंघातील युवा नेतृत्वाची भूमिका ठरणार निर्णायक

निवडणूक लोकसभेची कसोटी युवा नेत्यांची

*खानापूर विधानसभा मतदारसंघ*

स्व.आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी खानापूर पंचायत समितीचे उपसभापती पद आणि सांगली जिल्हा परिषदेत जि.प.उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. तर माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र अ‍ॅड. वैभव पाटील यांनी विटा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवित आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सक्रिय आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी समाजकल्याण सभापती म्हणून सांगली जिल्हा परिषदेत नेतृत्वाची छाप पाडली आहे. तर माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचे सुपुत्र हर्षवर्धन देशमुख यांनी आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. या चारही युवा नेत्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या युवा नेत्यांनी चांगले युवा संघटन करत मतदारसंघातील आपल्या गटाच्या युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली आहे.

प्रभावी जनसंपर्क, निवडणूकीतील कार्यकर्त्यांची यंत्रणा हाताळण्याचा अनुभव, कार्यकर्त्यांचे हक्काचे नेटवर्क आणि परफेक्ट नियोजन हे या युवा नेत्यांकडे असल्याने आगामी आमदारकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगीत तालीम सुरू केली आहे.
खानापूर-आटपाडीत महायुतीचे मोठे प्राबल्य आहे.

संजयकाका पाटील यांना खानापूर-आटपाडीतून 65 ते 70 हजार मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.

युवा नेते सुहास बाबर, अ‍ॅड. वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर आणि हर्षवर्धन देशमुख या युवा नेत्यांनी मतदारसंघातील आपापली यंत्रणा सक्रिय केली असून महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना खानापूर-आटपाडीतून 65 ते 70 हजार मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.
लोकसभा निवडणूकीत सुहास बाबर, अ‍ॅड. वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर आणि हर्षवर्धन देशमुख या चारही युवा नेतृत्वाची

युवा नेते ताकदीने लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने कार्यकर्त्यांना देखील स्फुरण चढले आहे.

संजयकाका पाटील यांना खानापूर-आटपाडीतून मताधिक्य देताना कसोटी पणाला लागणार आहे. युवा नेते ताकदीने लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने कार्यकर्त्यांना देखील स्फुरण चढले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि राजकीय वर्चस्वाची बनणार आहे.
आगामी राजकीय वाटचालीची रियल्सल म्हणून या लोकसभा निवडणूकीकडे पाहिले जात आहे.

संजयकाकांच्या खानापूर मतदारसंघातील प्रचाराची धुरा सुहास बाबर, वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर आणि हर्षवर्धन देशमुख या चारही युवा नेत्यांकडे आहे. त्यामुळे आगामी राजकीय वाटचालीची मशागत लोकसभा निवडणूकीत करून घेण्यासाठी हे चारही युवा नेते आपापले कसब वापरू लागले आहेत. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील जनतेला आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पहावयास मिळणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज