rajkiyalive

khanapur vidhansabha 2024 : बाबरांचा पैरा महाविकास आघाडीत घेऊन फेडणार: विशाल पाटील

गोपीचंद पडळकरांकडून धनगर समाजाची फसवणूक

जनप्रवास । प्रतिनिधी

khanapur vidhansabha 2024 : बाबरांचा पैरा महाविकास आघाडीत घेऊन फेडणार: विशाल पाटील : खानापूर-आटपाडीत महायुतीचे चार नेते आहेत, महाविकास आघाडीतील नेते त्यातील काहींना उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मी युवा नेते सुहास बाबर यांचा पैरा फेडण्यासाठी महाविकास आघाडीत यावे, असा आग्रह केला आहे. त्यासाठी वरिष्ठांकडून काही सोडवणूक देखील केली आहे. मात्र ठाकरे गटाचे नेते प्रसिध्दीसाठी चुकीचे आरोप करत आहेत, अशी टीका खा. विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. तर आ. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाची फसवणूक करून काँग्रेस नेत्यांची बदनामी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

khanapur vidhansabha 2024 : बाबरांचा पैरा महाविकास आघाडीत घेऊन फेडणार: विशाल पाटील

ते म्हणाले, खानापूर-आटपाडीमध्ये महाविकास आघाडीकडे एकही चेहरा नाही. या संदर्भात काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. महायुतीकडे चार उमेदवार इच्छूक आहेत. त्यातील एकाला उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत. पण माझा आग्रह आहे की युवा नेते सुहास बाबर यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी द्यायची मग ती शिवसेना उध्दव ठाकरे गटाची असो किंवा काँग्रेसची. यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. तेच व्यासपीठावर बोलले होते. मात्र त्याला स्वत:च्या सोयीसाठी कुणाचा विरोध असेल तर मी प्रयत्न थांबतो. आघाडी धर्माची जबाबदारी सर्वांची आहे. केवळ टीव्हीवर चेहरा दिसावा आणि प्रसिध्दी मिळावी म्हणून कुणी काहीही बोलू नये, असा टोला खा. विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचे संजय विभूते यांना लगाविला.

आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणार्‍यांवर बोलावे.

ते पुढे म्हणाले, ओबीसी मेळाव्यासंदर्भात ना. छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर, प्रा. लक्ष्मण हाक्के यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. भाजपच्या संगीता खोत, विष्णू माने यांच्यासारखी काही भाजपचे लोक आले होते. मराठा-ओबीसी वाद सांगलीत भडकवू नये म्हणून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना घेऊ नये, अशी भूमीका होती. पण याचा राजकीय सोयीचा अर्थ काढून काँग्रेस नेते आ. विश्वजीत कदम व मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांची ही राजकीय स्टंटबाजी आहे. आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणणार्‍यांवर बोलावे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जतमध्ये कार्यक्षम काँग्रेस आमदार आहेत, त्यांना डॅमेज करण्यासाठी ते काँग्रेस विरोधात बोलत आहेत. ओबीसींबाबत मी चुकीचे बोललो होतो, असे म्हणणार्‍यांनी बिरोबाचा भंडारा उचलावा, असे आव्हान खा. विशाल पाटील यांनी दिले.

राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणात सांगलीचा समावेश नाही,

ते पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणात सांगलीचा समावेश नाही, मिरज रेल्वे जंक्शन असताना सांगलीला डावलून कोल्हापूर, इचलकरंजीचा समावेश होतो. तेथे भाजपचा एकही आमदार नाही. सांगली भाजपचे आमदार तर मिरजेत भाजपचे पालकमंत्री आहेत. तरीही सांगलीचे नाव नाही. माजी खासदार निवडणुकीपुरते त्यावर बोलले. या अकार्यक्षम नेत्यामुळेच ड्रायपोर्ट, एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क सांगलीला मिळू शकलेला नाही, असा आरोप खा. पाटील यांनी केला. मिरज-तासगाव-विटा-फलटण व कराड-पंढरपूर रेल्वे मार्ग होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचा सर्वे देखील सुरू आहे. कवलापूर येथील विमानतळ संदर्भात नागरी विमान वाहतूकमंत्री राम नायडू व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच केंद्रीय पथक कवलापुरात येणार असल्याचे खा. विशाल पाटील यांनी सांगितले.

दहा वर्षात संजयकाकांना जमले नाही ते पहिल्या अधिवेशात केले…

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी संसदेत गेल्या दहा वर्षात जितके प्रश्न विचारले, जितक्या चर्चेत सहभागी झाले. त्यापेक्षा अधिक चर्चा मी पहिल्या अधिवेशनात केल्या असल्याचा टोला खा. विशाल पाटील यांनी काकांना लगाविला. संसदेत बोलण्यासाठी लोकांचे विषय माहिती असावे लागतात, त्यासाठी लोकांत जावे लागते, संसद अध्यक्ष आणि आपल्या नेत्यांना विषयाचे महत्व समजावून द्यावे लागते, त्यानंतर संधी मिळते. पक्ष कोणता असे काय नसते. प्रश्न माहिती असणे आवश्यक असल्याचा टोला खा. विशाल पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना लगाविला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज