rajkiyalive

khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार : संजय विभूते

संपर्क नेते भास्कर जाधव यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारीला लागण्याचे दिले आदेश

जनप्रवास/विटा
khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार : संजय विभूते : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खानापूर विधानसभा मतदारसंघाची मागणीच केली नाही. या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहे. आमच्या पक्षाचा आमदार व्हावा, ही विचारधारेतून निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख वीरू फाळके, तालुकाप्रमुख राज लोखंडे, अमीर मुलानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

khanapur vidhansabha 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार : संजय विभूते

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, संपर्क नेते भास्कर जाधव यांनी खानापूर मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्यासाठी आपल्याला तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. खानापूर विधानसभा निवडणूकीत गेल्या सलग दोन वेळा शिवसेना पक्षाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क आहे. या मतदारसंघातील प्रस्थापित सर्वच नेते महायुतीमध्ये आहेत. मात्र यातील बहुतांश नेत्यांचा शिंदे गटाच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी करावी, यासाठी आम्ही माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

sanjay vibhute.pdf 2

त्यांना आपण एक महिन्यात विचार करून सांगा, असे त्यांना सांगितले होते. आता बराच कालावधी झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही तयारीला लागलो आहोत. नुकताच संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांचा दौरा पश्चिम महाराष्ट्रात झाला. यावेळी आम्ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी आपल्याला विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांनी आता सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तीला आमदार करण्यासाठी माझ्या पाठीशी ताकद उभा केली पाहिजे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या विकासासाठी पक्ष बदलल्याचे सांगणारे अनेकजण आहेत. अलिकडच्या काळात विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी अडवण्याचे प्रकार विशेषतः 2014 नंतर वाढले आहेत. पूर्वी विरोधी आमदारांनाही निधी दिला जात होता. हे राजकारण बदलण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक जाणिवपूर्वक करीत आहेत काय ? अशी शंका निर्माण होत आहे. मात्र नागरिकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले.

गावनिहाय दौरा करून जनतेशी संवाद साधणार

मिंदे गटाविरुद्ध एकास एक लढत व्हावी यासाठी मी मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यांना आपण एक महिन्यात विचार करून सांगा, असे त्यांना सांगितले होते. मात्र अद्याप त्यांचा निर्णय झालेला आहे. त्यामुळेच संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलोय. निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच होणार आहे. शिवसेनेची मशाल ताकदीने पेटेल. पितृपंधरवडा झाल्यानंतर मतदारसंघाचा गावनिहाय दौरा करून जनतेशी संवाद साधून भूमिका मांडणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज